१६़१३ कोटी प्राप्त; पण वाटपात दिरंगाई

By Admin | Updated: March 10, 2015 01:27 IST2015-03-10T01:27:56+5:302015-03-10T01:27:56+5:30

नापिकी झाल्यास शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फटका बसू नये म्हणून प्रथमच जिल्ह्यात हवामान आधारित पीक

16 crore received; But the allocation delayed | १६़१३ कोटी प्राप्त; पण वाटपात दिरंगाई

१६़१३ कोटी प्राप्त; पण वाटपात दिरंगाई

हवामान आधारित पीक विमा योजना : ३२ हजार ३५२ शेतकऱ्यांना प्रतीक्षा
प्रशांत हेलोंडे ल्ल वर्धा

नापिकी झाल्यास शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फटका बसू नये म्हणून प्रथमच जिल्ह्यात हवामान आधारित पीक विमा योजना राबविण्यात आली़ ही योजना सक्तीची असल्याने ३२ हजार ३५२ शेतकऱ्यांच्या कर्जातून विमा हप्ता कपात करण्यात आला. यात झालेल्या नुकसानाची रक्कम आठ दिवसांपूर्वी बँकांना प्राप्त झाली; पण ती अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्यात आली नाही़ यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायमच दिसते़
खरीप हंगामात पीक कर्जाची उचल करीत असतानाच शेतकऱ्यांच्या कर्जातून विम्याच्या हप्त्याची कपात करण्यात आली़ यामुळे जिल्ह्यातील तब्बल ३२ हजार ३५२ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला़ यंदा जिल्ह्यातील संपूर्ण गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली़ यामुळे सरसकट सर्वच शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे़ या योजनेत अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाची मध्यस्थी असल्याने नापिकी झालेल्या व पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांची यादी विमा कंपनीकडे पाठविण्यात आली़ त्यानुसार जिल्ह्याला या योजनेपोटी १६ कोटी १३ लाख ८६ हजार ३५८ रुपये प्राप्त झाले आहेत़ सदर विमा कंपनीने ही रक्कम अ‍ॅक्सीस बँकेत जमा केली़ किमान आठ दिवसांपूर्वी ही रक्कम संबंधित बँकांना वर्ग करण्यात आली आहे़
बँक आॅफ इंडियाचे खातेदार असलेल्या शेतकऱ्यांकरिता बँकेच्या नागपूर मुख्य शाखेत धनादेश देण्यात आला़ यानंतर सदर रक्कम बँकेतील खातेदारांच्या संख्येप्रमाणे सर्व शाखांना पोहोचती करण्यात आली आहे़ ती भारतीय स्टेट बँकेच्याही सर्व शाखांना वितरित करण्यात आली आहे़ केवळ आष्टी, अल्लीपूर व वायगाव (नि़) येथील शाखांची रक्कम वर्धा येथील मुख्य शाखेला प्रदान करण्यात आलेला आहे़
आठ दिवसांपासून ही प्रक्रिया पूर्ण होत असताना बँकांनी वाटप सुरू केले नाही़ यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या लाभासाठी बँकांत चकराच माराव्या लागत आहे़ नापिकी व आर्थिक विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ त्वरित देणे गरजेचे असताना बँका आडमुठे धोरण स्वीकारत असल्याचे दिसते़ या प्रकारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे़ काही बँकांनी तत्परतेने रकमेचे वाटप सुरू केले असले तरी काही राष्ट्रीयकृत व खासगी बँका अद्याप रक्कम वितरित करीत नसल्याचे वास्तव जिल्ह्यात आहे.
कृषी विभागाने एक महिन्यापूर्वीच शेकऱ्यांना विमा योजनेतील रक्कम प्राप्त झाल्याचे जाहीर केले होते़ वास्तविक, आठ दिवसांपूर्वी रक्कम प्राप्त झाली असून अद्याप वाटप सुरू झाले नाही़ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ती रक्कम जमा होणार असल्याने अडचणीचे ठरणार आहे़ बँक व्यवस्थापकांनीच सदर रक्कम बचत खात्यात वळती करणे गरजेचे आहे़
हवामान आधारित पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना देय असलेले १६ कोटी १३ लाख ८६ हजार रुपये बँकांना प्राप्त झाले आहे़ बँक आॅफ इंडियाद्वारे लगेच वाटप सुरू करण्यात येत असून सर्व बँकांनाही शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित रक्कम जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत़
- अनंत मिसे, व्यवस्थापक, अग्रणी बँक, वर्धा़
२० मार्चपर्यंत वाटप अपेक्षित

बँक आॅफ इंडियाच्या २९ शाखांना ६़९७ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला़ सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्याची प्रक्रिया सुरू झाली़ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ही जमा होणार असल्याने माहिती मिळणार नाही़ बँक व्यवस्थापकांना ती पुन्हा शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करावी लागणार आहे़ तत्सम सूचना सर्व बँकांना दिल्या असून २० मार्चपर्यंत वाटप अपेक्षित असल्याचे लीड बँक प्रशासनाने सांगितले़
याद्यांचे गौडबंगाल
खरीप हंगामाकरिता ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाची उचल केली, त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे़ असे असले तरी संबंधित बँकांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची यादी लावणे गरजेचे होते; पण कुठल्याही बँकेमध्ये तशी यादी लावण्यात आलेली नाही़ यामुळे शेतकऱ्यांना कळणेही कठीण झाले आहे़

Web Title: 16 crore received; But the allocation delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.