१५० विद्यार्थी १० सीजीपीएत
By Admin | Updated: May 29, 2016 02:16 IST2016-05-29T02:16:26+5:302016-05-29T02:16:26+5:30
सीबीएसई दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. हा निकाल श्रेणीनुसार असल्याने यात जिल्ह्यातून प्रथम कोण हे कळणे कठीणच ठरले.

१५० विद्यार्थी १० सीजीपीएत
सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर : १० शाळांचा निकाल १०० टक्के
वर्धा : सीबीएसई दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. हा निकाल श्रेणीनुसार असल्याने यात जिल्ह्यातून प्रथम कोण हे कळणे कठीणच ठरले. काही शाळांनी टक्केवारीनुसार निकाल जाहीर केला तर काहींनी अशी टक्केवारी चुकीचे असल्याचे म्हणत श्रेणीनुसार निकाल दिला. केंद्रीय बोर्डाने हा निकाल जाहीर करताना सीजीपीए अशी श्रेणी पद्धत जाहीर केली आहे. जिल्ह्यातील शाळांनी दिलेल्या माहितीनुसार १५० विद्यार्थी सीजीपीए श्रेणीत आले आहेत.
या अभ्यासक्रमाच्या जिल्ह्यात एकूण ११ शाळा आहेत. यातील १० शाळांचा निकाल १०० टक्के लागला. यात सेलूकाटे येथील नवोदय विद्यालयातून ८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. येथील २७ विद्यार्थ्यांनी सीजीपीए श्रेणीत १० पैकी १० गुणांकन घेतले आहे. या शाळेतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी काही विषयात १०० पैकी १०० गुण घेतल्याचे शाळेकडून कळविण्यात आले आहे.
भूगाव येथील भवन्स लॉयड्स विद्यानिकेतन येथून १२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३६ विद्यार्थ्यांनी केंद्रीय बोर्डाने दिलेल्या सीजीपीए श्रेणीनुसार १० पैकी १० गुणांकन घेतले आहे. वर्धेच्या गांधी सिटी पब्लिक स्कूल येथून २८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या शाळेतील आठ विद्यार्थ्यांनी सीजीपीए श्रेणीत १० पैकी १० गुणांकन घेतले आहे. म्हसाळा येथील अग्रगामी कॉन्व्हेंट येथून ४५ विद्यार्थ्यांनी या सत्रात दहावीची परीक्षा दिली. त्यातील सहा विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या निर्णयानुसार सीजीपीए श्रेणीत १० पैकी १० गुणांकन घेतले. सावंगी (मेघे) येथील अल्फोन्सा स्कूल मधून १०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १७ विद्यार्थ्यांनी सीजीपीए श्रेणीनुसार १० पैकी १० गुणांकन घेत यश प्राप्त केले.
हिंगणघाट तालुक्यातील भवन्स गिरधरदास मोहता विद्यामंदिरातून ३४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी १५ विद्यार्थ्यांनी सीजीपीए श्रेणीनुसार १० पैकी १० गुणांकन घेतले आहे. येथीलच सेंट जॉन कॉन्व्हेंट येथून १८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा घेतली. त्यापैकी १४ विद्यार्थ्यांनी सीजीपीए श्रेणीनुसार १० पैकी १० गुणांकन घेतले.
पुलगाव येथील केंद्रिय विद्यालयातून एकूण ७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात नऊ विद्यार्थ्यांना सीजीपीए श्रेणीनुसार १० पैकी १० गुणांकन प्राप्त केले. सावंगी (मेघे) येथील स्कूल आॅफ स्कॉलर्स मधून १२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील पूर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १७ विद्यार्थ्यांनी १० पैकी १० गुणांकन घेतले आहे. त्याचप्रमाणे पवनार येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशल स्कूल येथील एकाने १० सीजीपीए घेतला. रमाबाई देशमुख पब्लिक स्कूलनेही १०० टक्के निकाल दिला.(प्रतिनिधी)