कारंजा तालुक्यातील १५ पूल जीर्णावस्थेत

By Admin | Updated: August 5, 2016 02:12 IST2016-08-05T02:12:56+5:302016-08-05T02:12:56+5:30

तालुक्यातील बहुतांश गावांना जोडणारे रपटे, व मोठे पूल जीर्णावस्थेत आहे. यातील जवळपास १५ पुलांची कालमर्यादा संपली आहे.

15 pool jeopardy in Karanja taluka | कारंजा तालुक्यातील १५ पूल जीर्णावस्थेत

कारंजा तालुक्यातील १५ पूल जीर्णावस्थेत

कालमर्यादा संपली : कायमस्वरूपी उपापयोजनांचा अभाव असल्याने अपघात वाढले
रूपेश मस्के कारंजा (घा.)
तालुक्यातील बहुतांश गावांना जोडणारे रपटे, व मोठे पूल जीर्णावस्थेत आहे. यातील जवळपास १५ पुलांची कालमर्यादा संपली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांकडून तात्पुरती डागडुजी करून वेळ मारून नेली जात आहे. कायमस्वरुपी उपाययोजना होत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
पावसाळ्यात ठेंगण्या पुलांना पूर येऊन गावांचा संपर्कही तुटतो. त्यातही जिर्ण पुलांवरून जीव मुठीत घेवुन दळणवळण करावी लागते. तालुक्यात कारंजा शहरातील पूल, गवंडी, उमरी, येनगांव, चंदेवाणी सेलगांव व धर्ती या गावाला जोडणारा पूल ५ ते ६ वर्षांपासून पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला. असे असले तरी पुलाचे काम प्रलंबितच आहे या रस्त्यावरील लहान पूलही धोकादायक ठरत आहे.
तसेच धर्ती-मूर्ती येथील पूल, बांगडापूर वर्धा रोडवरील पुल, मोर्शी, खरसखांडा, सावल, धावसा, पालोरा, पारडी या गावातील नद्यांवरही नव्याने उंच पूल बांधण्याची गरज वारंवार व्यक्त होत आहे.
 

Web Title: 15 pool jeopardy in Karanja taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.