लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे वर्धा बसस्थानक परिसरात सापळा रचून केलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १.५ लाखांचा गांजा जप्त केला. ही कारवाई शनिवारी सायंकाळी उशीरा करण्यात आली. अब्दुल रजीक अब्दुल जब्बार (२३) व प्रवीण सुभाष धर्माळे (२६) दोन्ही रा. अमरावती, असे आरोपींचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलीस सूत्रानुसार, वर्धामार्गे बसचा प्रवास करून अमरावतीच्या दिशेने गांजा नेल्या जात असल्याची खात्रिदायक माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी वर्धा बसस्थानकावर सापळा रचून अब्दुल रजीक अब्दुल जब्बार व प्रवीण धर्माळे याला ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील साहित्याची पाहणी केली असता दोन कॉलेज बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी सदर दोन्ही आरोपींपासून एकूण १ लाख ५ हजार रुपये किमतीचा १० किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी अब्दुल रजीक अब्दुल जब्बार व प्रवीण धर्माळे यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार बोदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चेतन बोरखेडे, बालाजी देवढे, श्रीकांत खडसे, गजानन गहूकर, अनिल चिलगर, नीतेश बावणे, निखील वासेकर, नागनाथ पुंडगीर, यशवंत वाघमारे, महेंद्र अडाऊ यांनी केली. या आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची बुधवारपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे.
बसस्थानकावरून १.५ लाखांचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:29 IST
शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे वर्धा बसस्थानक परिसरात सापळा रचून केलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १.५ लाखांचा गांजा जप्त केला. ही कारवाई शनिवारी सायंकाळी उशीरा करण्यात आली. अब्दुल रजीक अब्दुल जब्बार (२३) व प्रवीण सुभाष धर्माळे (२६) दोन्ही रा. अमरावती, असे आरोपींचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बसस्थानकावरून १.५ लाखांचा गांजा जप्त
ठळक मुद्देदोघांना अटक : शहर पोलिसांची कारवाई