शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

जलयुक्त शिवारमुळे दीड लाख हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:31 PM

जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे केवळ सिंचन क्षमताच वाढली नाही तर असंख्य गावांचा पाण्याचा ताळेबंद तयार झाला आहे. वर्धा  जिल्ह्यात मागील तीन वर्षात जलयुक्त शिवारमध्ये ५६८ गावाची निवड करण्यात आली होती.

ठळक मुद्देशेतीला संजीवनी : ८० हजार ९५१ टीएमसी पाणीसाठ्याची उपलब्धी, अभियानात विविध संस्थांचा लागला हातभार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे केवळ सिंचन क्षमताच वाढली नाही तर असंख्य गावांचा पाण्याचा ताळेबंद तयार झाला आहे. वर्धा  जिल्ह्यात मागील तीन वर्षात जलयुक्त शिवारमध्ये ५६८ गावाची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये झालेल्या कामांमधून १ लाख ५१ हजार ५३६ हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. याचा असंख्य शेतकऱ्यांना लाभ झाला असून शेतीलाही संजीवनी मिळाली आहे.पावसाचे पाणी शिवारातच अडवून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, विकेंद्रित जलसाठे निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या आणि निकामी झालेल्या जलस्रोतांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापीत करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आणि पाणी अडविण्याच्या कामात लोकसहभाग वाढविणे हा उद्देश घेऊन २०१५ पासून ही योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. कृषि विभाग, जलसंधारण (राज्य), जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, वन विभाग, सामाजिक वनीकरण, पाटबंधारे विभाग, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा इत्यादी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. २०१५-१६ मध्ये ८ तालुक्यातील २१४ गावांची या अभियानात निवड करण्यात आली होती.कृषी विभाग, लघुसिंचन जिल्हा परिषद, लघुसिंचन राज्य, भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, वनविभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, यशोदा नदी पुनर्जीवन विकास प्रकल्पाअंतर्गत २१४ गावातील २ हजार ९२७ कामे पूर्ण करण्यात आली. दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु केलेल्या या अभियानामुळे २०१५-१६ मध्ये सर्वच २१४ गावे शंभरटक्के वॉटर न्युट्रल झाली आहे. या कामामुळे जिल्ह्यात या वर्षात ७४ हजार ९१६ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. तसेच ३७ हजार ४५८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या पाण्यामुळे पावसाच्या खंड काळात कोमेजलेल्या पिकांना संजीवनी दिली आहे. सन २०१६-१७ मध्ये २१० गावाची निवड करण्यात आली असून या गावात २ हजार ३८७ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. ती सर्व कामे पुर्ण करण्यात आली आहे. यावर ९३ कोटी २१ लाख ५६ हजार रुपये खर्च झाला.भूजल पातळीत झाली वाढया कामांमुळे २७ हजार ६६० टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला.पूर्ण करण्यात आलेल्या जलयुक्त शिवारच्या कामामधून ५८ हजार ९५४ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. या वर्षात निवडण्यात आलेल्या २१० गावांपैकी १४३ गांवे शंभर टक्के वाटर न्युट्रल झाली आहेत. वरिष्ठ भुवैज्ञानिक भुजल विकास यंत्रणा यांनी सर्वेक्षण केलेल्या गावामध्ये ०.२०. ते २.६० मीटरने भूजल पातळीमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.सन २०१७-१८ मध्ये जिल्हयातील १४४ गावांची निवड करण्यात आली असून विविध यंत्रणांमार्फत १ हजार ४५९ कामे प्रस्तावित केली आहेत. यापैकी १ हजार ४२५ कामे पूर्ण झालेली असून उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहे. या सर्व कामामुळे १५ हजार ८३३ टीसीएम पाणीसाठा उपलब्ध होऊन अंदाजे २८ हजार ६६६ हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.मागील तीन वर्षात ८० हजार ९५१ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून १ लाख ५१ हजार ५३६ हेक्टर सरंक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवारच्या कामासाठी राज्य शासन सोबतच कमलनयन बजाज फाउंडेशन, टाटा ट्रस्ट, सिध्दिविनायक ट्रस्ट, साईबाबा ट्रस्ट, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टचा निधी तसेच लोकसहभाग महत्वाचा ठरत आहे. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार