महिलांना १५ लाख ३२ हजारांनी गंडविले
By Admin | Updated: November 22, 2014 23:06 IST2014-11-22T23:06:38+5:302014-11-22T23:06:38+5:30
येथील समतानगर, विक्रमशिलानगर, मास्टर कॉलनी व सेवाग्राम येथील नागरिकांना माया अग्रवाल व महेंद्र अग्रवाल या दोघांनी १५ लाख ३२ हजार ४०० रुपयांनी गंडा घातल्याची तक्रार शहर ठाण्यात करण्यात आली.

महिलांना १५ लाख ३२ हजारांनी गंडविले
वर्धा : येथील समतानगर, विक्रमशिलानगर, मास्टर कॉलनी व सेवाग्राम येथील नागरिकांना माया अग्रवाल व महेंद्र अग्रवाल या दोघांनी १५ लाख ३२ हजार ४०० रुपयांनी गंडा घातल्याची तक्रार शहर ठाण्यात करण्यात आली. ही तक्रार एकूण ४८ महिला व दोन पुरूषांनी केली आहे. या दोघांनी गंडविल्याची तक्रार यापूर्वी १९ महिलांनी शहर ठाण्यात केली होती. त्याचा तपास सुरू असताना पुन्हा आलेल्या तक्रारीवरून यात गंडविल्या गेलेले आणखी नागरिक असतील ु, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
ही तक्रार येथील सत्यमेव जयते जनआंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष राहुलकान्त सिन्हा, विदर्भ प्रभारी सुभाष खोडके, जिल्हा अध्यक्ष वर्धा सिद्धांत कांबळे यांनी या नागरिकांसह नोंदविली. फसवणुकीची एकूण रक्कम १५ हजार ३२ हजार ४०० रुपये आहे. १८ नोव्हेंबर २०१४ ला १९ महिलांनी या दोघांपूर्वी तक्रार केली होती. त्यांची २४ लाख ३२ हजार १४५ रुपयांनी फसगत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सदर तक्रार स्टेशन डायरीमध्ये केली आहे. तर जुन्या तक्रारीसोबतच या तक्रारीलाही जोडण्यात येणार असल्याचे पालिसांनी सांगितले आहे. महेंद्र अग्रवाल गौरक्षण वॉर्डात राहतात. आरोपीचे अटक पूर्व जामीण मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जनआंदोलनाकडून कळविण्यात आले आहे. यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. शहरात आणि शहराच्या बाहेर २०० पेक्षा जास्त महिलांना या दोघांनी फसविल्याचा आरोप सत्यमेव जयते जनआंदोलनाच्यावतीने करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करून आरोपीला ताबडतोब अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)