१५ दिवसांत काजीपेठ-पुणे हिंगणघाटला थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:28 IST2017-10-30T22:27:55+5:302017-10-30T22:28:11+5:30
येत्या १५ दिवसांच्या आत येथील रेल्वे स्थानकावर काजीपेठ ते पुणे एक्स्प्रेसचा थांबा मिळवून देण्यात येईल.

१५ दिवसांत काजीपेठ-पुणे हिंगणघाटला थांबणार
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येत्या १५ दिवसांच्या आत येथील रेल्वे स्थानकावर काजीपेठ ते पुणे एक्स्प्रेसचा थांबा मिळवून देण्यात येईल. यासाठी आपण जातीने प्रयत्न करणार असून लवकरच प्रश्न मार्गी लावून, अशी ग्वाही खा. रामदास तडस यांनी दिली.
काजीपेठ-पुणे एक्स्प्रेसला हिंगणघाट थांबा द्यावा, अशा मागणीचे निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी वर्धा येथे खा. तडस यांची भेट घेत दिले. यावेळी ते बोलत होते. तालुक्यातील प्रवाशांसाठी काजीपेठ ते पुणे ही गाडी हिंगणघाट रेल्वे स्थानकात थांबविण्याबाबत काही दिवसांपूर्वी संघटनांनी गिरधर राठी यांच्या नेतृत्वात रेल्वे विभागाला निवेदन दिले होते; पण यावर तोडगा निघालेला नाही. हिंगणघाट शहरातून दोन ते अडीच हजार प्रवासी शिक्षण व नोकरीसाठी हिंगणघाट ते पुणे प्रवास करतात. यामुळे काजीपेठ गाडी हिंगणघाटला थांबणे गरजेचे आहे. यासाठी सोमवारी समाजसेवक अतुल वांदिले यांनी खा. तडस यांची वर्धा येथे भेट घेतली. यावेळी १५ दिवसांतच हा प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.