११२ बचत गटांना वऱ्हाड महोत्सवात देणार १५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST2020-01-08T06:00:00+5:302020-01-08T06:00:11+5:30
विभागस्तरीय असलेल्या या वऱ्हाड महोत्सवात एकूण १२६ महिला बचत गट सहभागी होणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील १५, भंडारा १२, गडचिरोली १४, गोंदीया २०, चंद्रपूर १०, वर्धा ५५ तर बुलढाणा १ आणि जळगाव येथील दोन महिला बचत गट सहभागी होणार आहेत. महिलांना सक्षम करण्याचा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमही याप्रसंगी पार पडणार आहे.

११२ बचत गटांना वऱ्हाड महोत्सवात देणार १५ कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बुधवार ८ ते १२ जानेवारी या कालावधीत लोक महाविद्यालयाच्या मैदानावर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि. प. यांच्या संयुक्त विद्यमाने वºहाड महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याच महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी तब्बल ११२ महिला बचत गटांना सुमारे १५ कोटींच्या अर्थसहाय्याचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी सत्यजीत बढे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
बढे पुढे म्हणाले, विभागस्तरीय असलेल्या या वऱ्हाड महोत्सवात एकूण १२६ महिला बचत गट सहभागी होणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील १५, भंडारा १२, गडचिरोली १४, गोंदीया २०, चंद्रपूर १०, वर्धा ५५ तर बुलढाणा १ आणि जळगाव येथील दोन महिला बचत गट सहभागी होणार आहेत. महिलांना सक्षम करण्याचा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमही याप्रसंगी पार पडणार आहे. सदर वºहाड महोत्सवाचे उद्घाटन नेमके कोण करणार हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी, आमदार, खासदार यांना निमंत्रण देण्यात आले असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
स्वच्छ आणि निरोगी आरोग्याविषयी प्रभावी जनजगृती करण्याच्या उद्देशाने या महोत्सवात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभागाचा स्टॉल राहणार असल्याचेही सत्यजीत बढे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला महाराज्य राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या स्वाती वानखेडे यांची उपस्थिती होती.
सेल्फी पॉर्इंट घालणार भूरळ
वऱ्हाड महोत्सवात विविध खाद्यपदार्थांची मेजवानी राहणार असून बच्चेकंपनींसह नागरिकांना भूरळ घालेल असा एक सेल्फी पॉर्इंट राहणार आहे. या महोत्सवाचा वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही सत्यवीर बढे यांनी यावेळी केले.