कर्करोग जनजागृती सप्ताहांतर्गत १४७ रुग्णांची तपासणी

By Admin | Updated: February 7, 2016 00:19 IST2016-02-07T00:19:35+5:302016-02-07T00:19:35+5:30

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोेग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्करोग जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.

147 patients check under cancer awareness week | कर्करोग जनजागृती सप्ताहांतर्गत १४७ रुग्णांची तपासणी

कर्करोग जनजागृती सप्ताहांतर्गत १४७ रुग्णांची तपासणी

तपासणी शिबिर : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम
वर्धा : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोेग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्करोग जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यात आयोजित शिबिरात कर्करोगाच्या १४७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिवाय व्हीआरए तपासणी २७, संशयित गर्भाशय कर्करोग रुग्ण ३, संशयित स्तन कर्करोग रुग्ण १ व संशयित तोंडाचा कर्करोग असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.
जागतिक कर्करोग जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन शुक्रवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.बी. राठोड, जिल्हा आरोेग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. गोपाल लांडगे, डॉ. एच.बी. खुबनानी, डॉ. मीना हिवलेकर, डॉ. भावना भोयर व जिल्हा रुगणालयातील कर्मचारी उपस्थित होते. तपासणी शिबिर ११ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणार आहे. रुग्णालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणार नाही व इतरांना करू देणार नाही, अशी शपथ घेतली.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोेग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्करोग जनजागृती सप्ताह राबविला जात आहे. यात जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयात तपासणी शिबिरघे घेण्यात येत आहे. या शिबिरांचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मडावी यांनी केले. शिबिरात कर्करोगाबाबत समुपदेशन, ३० वर्षांवरील व्यक्तींना कर्करोगाची माहिती, कारणे, त्यामुळे होणाऱ्या गुंतागुती याबाबत शास्त्रीय माहितीच्या आधारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. विविध आरोग्य संस्थांतर्गत जनजागृती शिबिर, धुम्रपान विरोधी दिन, गरोदर मातांसाठी रक्तदाब तपासणी आदी शिबिरे घेतली जाणार आहे. सदर शिबिरादरम्यान त्यांना रक्तदाबाविषयी माहिती देण्यात येणार आहे. आरोग्यदायक सवयी, जीवन जगण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे. परिपूर्ण व आरोग्यदायी आहाराबाबत माहिती देण्यात येईल. शिबिरात निश्चित रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यात येणार आहे. निश्चित निदान झालेल्या रुग्णांना गुंतागुंत आढळल्यास योग्य वैद्यकीय तपासण्या करून गरज भासल्यास संदर्भित करण्यात येणार आहे. एनसीडी कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत वैद्यकीय तपासणी, मोफत समुपदेशन, गृहभेट यातून रुग्णांना मदत व मार्गदर्शन करणे, संदर्भ सेवा देणे, समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांना आरोग्यदायी पर्याय स्वीकारण्यास सूचविणे, काय खावे, किती खावे याचे महत्त्व समजावून सांगणे, तंबाखू, मद्यपान, अहितकारी, आहार याविरूद्ध समुदायाला एकत्र आणणे आदी सुविधा देण्यात येणार असल्याचेही डॉ. मडावी यांनी सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: 147 patients check under cancer awareness week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.