कृतिशील अध्ययनाकरिता १४.५० लाख रुपये

By Admin | Updated: July 15, 2015 02:34 IST2015-07-15T02:34:40+5:302015-07-15T02:34:40+5:30

जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची होत असलेली गळती रोखण्याकरिता विद्यार्थ्यांकरिता कृतिशील अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे.

14.50 lakhs for creative studies | कृतिशील अध्ययनाकरिता १४.५० लाख रुपये

कृतिशील अध्ययनाकरिता १४.५० लाख रुपये

आर्वी : जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची होत असलेली गळती रोखण्याकरिता विद्यार्थ्यांकरिता कृतिशील अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. याकरिता वैधानिक महामंडळाकडून १४. लाख ५० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. यात इयत्ता पहिली ते चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्राने दिली.
प्राप्त झालेला हा निधी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना खर्च करावयाचा आहे. २०१४-१५ या वित्तीय वर्षात विदर्भ विकास महामंडळाअंतर्गत विशेष निधी जिल्हा नियोजन समिती वर्धा यांच्या कडून जिल्हा परिषदेच्या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी हा निधी देण्यात आल्याची माहिती आहे. या निधीमधून जिल्हा परिषदेच्या शाळांना कृतीशील अध्ययन उपक्रमाचे साहित्य खरेदी करण्यासाठी १३ लक्ष व प्रशिक्षण व इतर खर्चासाठी १ लक्ष ५० हजार रुपये खर्च करावयाचे आहे.
विदर्भ विकास महामंडळाअंतर्गत विशेष निधी २०१५-१६ मध्ये जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेच्या १५ शाळेमध्ये जि.प. प्रमाणे कृतीशील अध्ययन उपक्रमासाठी १४ लाख ५० हजार रुपये देण्याचे निर्धारित केले आहे. आर्वी तालुक्यात इयत्ता पहिली ते चौथीच्या १४२ शाळा आहेत. इतर शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी इतर सर्वांगिण विकास करणे हा उद्देश निधी खर्चाच्या तरतुदीबाबत ठेवण्यात आला आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: 14.50 lakhs for creative studies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.