१४.२३ लाखांची गावठी दारू नष्ट

By Admin | Updated: July 29, 2015 02:02 IST2015-07-29T02:02:32+5:302015-07-29T02:02:32+5:30

जिल्ह्यातील गावठी दारू भट्ट्या उद्ध्वस्त करण्याची मोहीम पोलिसांच्यावतीने सुरू आहे.

14.23 lacs of liquor liquor destroyed | १४.२३ लाखांची गावठी दारू नष्ट

१४.२३ लाखांची गावठी दारू नष्ट

सावंगीच्या बेड्यावर धाड : सहा जणांना अटक; चार फरार
वर्धा : जिल्ह्यातील गावठी दारू भट्ट्या उद्ध्वस्त करण्याची मोहीम पोलिसांच्यावतीने सुरू आहे. यात सावंगी येथील बेड्यावर सेवाग्राम पोलिसांनी केलेल्या कारवाईत १४ लाख २३ जार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत मोठ्या प्रमाणात गावठी दारू नष्ट केली. यात सहा जणांना अटक करण्यात आली असून चार जण फरार झाले आहेत. अलीकडच्या काळातील ही मोठी कारवाई असल्याचे समजते.
बाबुलाल ग्यानसिंग भादा (४०), कुणालसिंग संतोषसिंग भादा (२०), प्रेमसिंग दिनेशसिंग भौंड (२५), बबुलसिंग मंगलसिंग भादा (३०), चिंगुसिंग ठाकुरसिंग भादा (२५), गीतासिंग गुरुसिंग बावरी (५०) सर्व रा. सावंगी (मेघे) अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत. तर अन्य चार पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच पसार झाल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी एकूण ४३ हजार ८०० रुपये किमतीची ४०२ लिटर गावठी दारू नष्ट केली. दारू गाळण्याकरिता तयार करण्यात आलेला १३ हजार ८०० लिटर मोहा सडवाही यावेळी नष्ट करण्यात आला. त्याची किंमत १३ लाख ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच कारवाई दरम्यान येथे कागदपत्र नसलेली काही दुचाकी वाहने मिळून आली. अशी एकूण १७ वाहन सेवाग्राम पोलिसांनी जप्त केली आहे. या कारवाईत सेवाग्राम पोलिसांनी एकूण १४ लाख २३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी संतोष वानखेडे यांच्यासह ठाणेदार पराग पोटे, सहायक निरीक्षक ठाकूर, नीलेश केळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक वासुदेव बोंदरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. या कारवाईत एकूण २५ पोलीस कर्मचारी सहभागी होते. यात पाच महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अशा मोहीम सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: 14.23 lacs of liquor liquor destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.