फरार आरोपीला तब्बल १४ वर्षांनंतर अटक

By Admin | Updated: May 29, 2016 02:21 IST2016-05-29T02:21:13+5:302016-05-29T02:21:13+5:30

शासकीय कामात अडथळा आणत रेल्वे कर्मचाऱ्यास धक्काबुक्की प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर फरार झालेल्या ....

14 years after the absconding accused arrested | फरार आरोपीला तब्बल १४ वर्षांनंतर अटक

फरार आरोपीला तब्बल १४ वर्षांनंतर अटक

रेल्वे पोलिसांची कारवाई : फिर्यादीही निवृत्त
वर्धा : शासकीय कामात अडथळा आणत रेल्वे कर्मचाऱ्यास धक्काबुक्की प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर फरार झालेल्या आरोपीस तब्बल १४ वर्षांनंतर अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश मिळाले.
शेख फिरोज शेख बशीर (३६), असे अटकेती आरोपीचे आहे. घटनेच्या वेळी तो २१ वर्षांचा होता. वर्धा लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीतील आनंदनगर पुलफैल रेल्वे क्रॉसिंग फाटकावर २००२ मध्ये गेटमनच्या शासकीय कामात अडथळा आणत धक्काबुक्की केली होती. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. शेख फिरोज शेख बशीर हा जामिनावर सुटल्यानंतर न्यायालयात सुनावणीस उपस्थित राहिला नाही. यामुळे न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला. पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण तो पोलिसांना आढळत नव्हता. या कालावधीत परिस्थिती बदलत गेली. या प्रकरणातील फिर्यादीही सेवानिवृत्त झाले. दरम्यान, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट यांच्या मार्गदर्शनात नवीन पत्ता शोधत शेख फिरोज शेख बशीर यास रेल्वे पोलिसांनी अटक केली. ही कारवाई जमादार असलम पठाण, वनस्कर, प्रवीण भिमटे यांनी केली. याबाबत पोलीस अधीक्षक टोंग यांनी पोलिसांचे कौतुक केले. पूढील तपास सुरू आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: 14 years after the absconding accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.