नराधम बापाकडून १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:00:05+5:30

पोलीस सूत्रानुसार, सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदणी (दिंदोडा) येथील एका महिलेचा राजस्थान येथील मूळ रहिवासी असलेल्या व्यक्तीशी सुमारे १५ वर्षांपूर्वी विवाह झाला. विवाहानंतर हे दाम्पत्य मदणी (दिंदोडा) येथेच वास्तव्याला असताना त्यांच्या घरी गोंडस मुलीने जन्म घेतला. परंतु, मद्याच्या आहारी गेलेला बापाची नियत थेट १४ वर्षीय मुलीवरच बिघडली. अशातच नराधम बापाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरूवात केली.

14 year old girl sexually abused by Naradham father | नराधम बापाकडून १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

नराधम बापाकडून १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

ठळक मुद्देआरोपी अटक : अश्लील व्हिडिओ काढून द्यायचा ठार करण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच लैर्गिंक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती तक्रारीनंतर उजेडात आली आहे. या प्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशीरा आरोपी बापाविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेत त्याला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी या आरोपीला सेवाग्राम पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्याची २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे.
पोलीस सूत्रानुसार, सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदणी (दिंदोडा) येथील एका महिलेचा राजस्थान येथील मूळ रहिवासी असलेल्या व्यक्तीशी सुमारे १५ वर्षांपूर्वी विवाह झाला. विवाहानंतर हे दाम्पत्य मदणी (दिंदोडा) येथेच वास्तव्याला असताना त्यांच्या घरी गोंडस मुलीने जन्म घेतला. परंतु, मद्याच्या आहारी गेलेला बापाची नियत थेट १४ वर्षीय मुलीवरच बिघडली. अशातच नराधम बापाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरूवात केली.
आरोपी इतक्यावर थांबला नाही तर त्याने मुलीचे अश्लिल व्हिडिओ तयार करून अत्याचाराची माहिती कुणालाही दिल्यास जीवानिशी ठार करण्याची धमकी पीडित मुलीसह तिच्या आईला दिली. अशातच सोमवारी पीडितेसह तिच्या आईच्या संयमाचा बांध फुटला. शिवाय घाबरलेल्या माय-लेकीने सेवाग्राम पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. या प्रकरणी तक्रारीवरून सेवाग्राम पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत आरोपीस अटक करून त्याची २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे. पुढील तपास सेवाग्रामचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे करीत आहेत.

मोबाईल जप्त
सदर प्रकरणातील आरोपीस सेवाग्राम पोलिसांनी अटक करून त्याची पोलीस कोठडी मिळविली आहे. शिवाय पोलिसांनी आरोपीने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त केला आहे.

अवघ्या तीन तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या
पीडितेची तक्रार प्राप्त होताच गुन्ह्याची नोंद घेऊन सेवाग्राम पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अवघ्या तीन तासांत मदणी (दिंदोडा) येथून अटक केली. आरोपी हा दारू पिण्याच्या व्यसनाचा असून पीडितेची आई रोजमजुरी करून कुटुंबाचा गाढा ओढते. शिवाय आरोपी बापाकडे राजस्थान येथे शेती आहे. ही शेती तो किरायाने देऊन त्यातून मिळणाऱ्या पैशातून वर्धा जिल्ह्यात मौज मारत असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.

आरोपी व्यसनाधीन
पीडितेवर लैगिंक अत्याचार करणारा आरोपी नराधम बाप हा व्यसनाधीन होता. शिवाय तो कुठलेही काम न करता कुटुंबीयांना मानसिक त्रास देत असल्याचे पुढे आले आहे.

पीडितेची तक्रार प्राप्त होताच गुन्ह्याची नोंद घेऊन आरोपीला झटपट अटक करण्यात आली. शिवाय त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सध्या सखोल तपास सुरू आहे.
- कांचन पांडे, ठाणेदार, सेवाग्राम.

Web Title: 14 year old girl sexually abused by Naradham father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.