शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

१३,७४२ जणांवर मोकाट श्वानांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:39 AM

जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरासह विविध शहारांमध्ये व गावांमध्ये सध्या बेवारस श्वानांचा मुक्त संचार होत आहे. श्वानांनी चावा घेतल्याने अ‍ॅन्टी रेबीज नामक प्रतिबंधात्मक लस १२ महिन्यात १३ हजार ७४२ नागरिकांना टोचण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागरिकांचा संतप्त सवाल : बेवारस कुत्र्यांचा बंदोबस्त केव्हा?

महेश सायखेडे ।ऑनलाईन लोकमतवर्धा : जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरासह विविध शहारांमध्ये व गावांमध्ये सध्या बेवारस श्वानांचा मुक्त संचार होत आहे. श्वानांनी चावा घेतल्याने अ‍ॅन्टी रेबीज नामक प्रतिबंधात्मक लस १२ महिन्यात १३ हजार ७४२ नागरिकांना टोचण्यात आली आहे. श्वानांच्या हैदोसामुळे बच्चेकंपनीसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने बेवारस श्वानांचा बंदोबस्त केव्हा, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.दिवस भर अन्न व पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणारे बेवारस श्वास अनेकदा छोट्या मुला-मुलींच्या अंगावर धावून जातात. इतकेच नव्हे तर रात्रीच्या सुमारास ते दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मागे धावतात. अचानक वाहनावर धावलेल्या श्वानामुळे वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून छोटे-मोठे अपघात झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाºयांनाही रात्री उशीरापर्यंत कर्तव्य बजावताना बेवारस श्वानांचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे. बेवारस श्वास बच्चेकंपनी व नागरिकांच्या अंगावर धाव घेऊन बहूदा चावा घेत असल्याने या प्रकाराकडे लक्ष देत संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी विशेष मोहीम हाती घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी जिल्ह्यातील सुजान नागरिकांची आहे.आता १४ ऐवजी ५ इंजेक्शनश्वान चावल्यास पूर्वी रुग्णाला पोटावर १४ इंजेक्शन न चुकता घ्यावे लागत होते. परंतु यात संशोधन झाल्याने रुग्णाला केवळ पाचच प्रतिबंधात्मक लस असलेले इंजेक्शन न चुकता घ्यावे लागतात अशी माहिती आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे रुग्णालाही मोठा दिलासा मिळाला आहे.रेबीजवर रामबाण औषध नाहीरेबीजची लागण झालेला श्वान माणसाला चावल्यास हा रोग माणसाला होतो. कुत्र्यांच्या लाळीमुळे रोगाचा प्रसार होत असून रेबीज हा रोग अत्यंत घातक व महाभयंकर आहे. सदर रोग मानवास किंवा पशुंना झाल्यास खूप हाल होऊन त्याला मरण येते. रेबीज रोगावर कोणतेही खात्रिदाक औषध नाही. केवळ रेबीज होऊ नये यासाठी प्रतिबंधक लस टोचून घेणे हाच एकमेव इलाज आहे.रेबीजची लक्षणे दिसतात ९० ते १७५ दिवसातरेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी असलेल्या श्वान, ससा, माकड, मांजर आदी चावल्यानंतर होणारा रोग आहे. या रोगामध्ये रुग्ण पाण्याला घाबरत असल्याने त्याला जलसंत्रास असेही म्हटले जाते. रेबीज हा रोग श्वानांनाही होतो. श्वानांमधून तो माणसात पसरणारा हा रोग असून या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसांमध्ये दिसतातश्वानांच्या लाळेद्वारे ‘जलसंत्रास’ रोगाचा प्रसाररेबीज या रोगाला ‘जलसंत्रास’ असेही संबोधले जाते. या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसतात. जंगलातील लांडगे जंगली श्वानांना चावतात त्यामुळे जंगली श्वानांना रेबीज होतो. ही जंगली श्वान गावातील श्वानांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो. शिवाय माणसाला चावल्यास माणसाला हा रोग होत असून श्वानांच्या लाळेद्वारे रोगाचा प्रसार होत असल्याचे सांगण्यात आले.