शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

१३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:57 IST

पुलगाव लष्करी तळ परिसरात वारंवार होणाऱ्या जीवघेण्या घटनांमुळे देवळी तालुक्यातील १३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर वसली असून या गावातील लोक प्रचंड दहशतीत राहात आहे.

ठळक मुद्देपुलगाव सीएडी कॅम्प प्रतिबंधित क्षेत्र : सन २००० पासून गावांचे पुनर्वसन दुर्लक्षित

हरिदास ढोक।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : पुलगाव लष्करी तळ परिसरात वारंवार होणाऱ्या जीवघेण्या घटनांमुळे देवळी तालुक्यातील १३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर वसली असून या गावातील लोक प्रचंड दहशतीत राहात आहे. त्यामुळे रक्षामंत्रालयाच्यावतीने सन २००२ ला पुलगाव डिफेन्सवॉलच्या बाहेरील दोन हजार यार्ड (२ कि़मी.) परिसरातील ही सर्व गावे हटविण्याची प्रक्रिया पार पाडली होती. पण सोळा वर्षाच्या कालावधीनंतरही येथील नारिकांना पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे.या तेरा गावांच्या पुनर्वसनासंदर्भात प्रक्रिया सुरु करुन सलग दोन वर्षपर्यंत या गावातील विकासकामे थांबविण्यात आली होती. रक्षा मंत्रालयाचे अप्पर सचिव ललीत चव्हाण यांनी राज्य सरकारला व राज्य सरकारने तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद म्हैसकार यांच्या मार्फत संबंधित ग्रामपंचायतींना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून नोटीस बजावून या गावांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला गती दिली होती. परंतु राज्य सरकारच्यावतीने संबंधित गावांना सेक्शन ४ ची नोटीस न दिल्याने तसेच वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे या गावांच्या पुनर्वसेनाचा मुद्दा थंडबस्त्यात पडला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या १६ वर्षात या गावांच्या पुनर्वसनाबाबतची रक्षामंत्रालयाची फाईल धुळखात पडली आहे.सन २००२ नुसार या गाव परिसराची लोकसंख्या २२ हजार ६५३ असून ४ हजार २६२ घरे तसेच ५०० हेक्टर जमीन आहे. हा सर्व परिसर ताबडतोब हटविण्याबाबतचे पत्र सीएडी कॅम्पचे तत्कालीन मेजर के.एस. महार, कॅप्टन पंजरन, मुंबई डिईओ पी.एल. रविदास व स्थानिक तहसीलदार टी.एस. बावणे यांचे स्वाक्षरीनिशी संबंधित ग्रामपंचायतींना पाठविण्यात आले होते. जिल्हाधिकारी व सीएडी कॅम्प अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार सलग दोन वर्षापर्यंत या गावातील विकासाची कामे थांबविण्यात आली होती. परंतु गावाच्या पुनर्वसनाची प्रक्रिया किचकट व टप्प्याटप्प्याने करावयाची असल्याने त्यावेळी राज्यशासनाने रक्षामंत्रालयाला सांगितले होते.तेव्हापासून क्षामंत्रालयाच्यावतीने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून या गावांच्या पुनर्वसनाबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे मागील काही वर्षात या भागात भयंकर घटना घडल्या आहे. जीवंत बॉम्ब गावात येवून पडल्याने जीवाच्या आकांताने लोक सैरावैरा पळाल्याचे उदाहरणे आहे. वारंवार होणाऱ्या घटनेत अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे प्रतिबंधित ठरलेली गावे उठविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.देवळी परिसरात गावांचे पुनर्वसन करादेवळी तालुक्यातील नाचणगाव, पिपरी, आगरगाव, नागझरी, मुरदगाव, येसगाव, नंदपूर, शेकापूर, शेकापूर (झोपडी), चिटकी, हरलापूर, बच्चराजपूर आदी गावात नेहमी घडणाऱ्या घटना चिंताजनक ठरल्या आहे. भविष्यातील हानी टाळण्यासाठी या गावांचे देवळी भागात पुनर्वसन करण्यात यावे. अशी मागणीमाजी जि.प. सदस्य मोहन शिदोडकर यांनी लावून धरली आहे..

टॅग्स :Bombsस्फोटकेBlastस्फोट