१३ ठाणेदारांचे खांदेपालट
By Admin | Updated: June 15, 2016 02:32 IST2016-06-15T02:32:12+5:302016-06-15T02:32:12+5:30
जिल्हा अंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत. यात इतर कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील १३ ठाणेदारांचे खांदेपालट करण्यात आले आहे.

१३ ठाणेदारांचे खांदेपालट
स्थानिक गुन्हे शाखा पराग पोटे, राजेंद्र शिरतोडेंकडे वर्धा
वर्धा : जिल्हा अंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत. यात इतर कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील १३ ठाणेदारांचे खांदेपालट करण्यात आले आहे. या बदल्यांत जिल्ह्यातील गुन्ह्यांचा छडा लावण्याची विशेष कामगिरी बजावणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
पराग पोटे आतापर्यंत सेवाग्राम ठाण्याचे निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी वर्णी लागल्याने सेवाग्राम ठाण्याचे ठाणेदार म्हणून वाचक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जी. के. वासेकर यांची बदली झाली आहे. वर्धा ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर बुराडे यांची पुलगाव येथे तर पुलगावचे ठाणेदार राजेंद्र शिरतोडे यांची बदली वर्धेचे ठाणेदार म्हणून झाली आहे. तळेगाव (श्यामजीपंत) येथील ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांची बदली वाचक शाखेत झाली तर एटीसी पथकाचे निरीक्षक दीपक साखरे तळेगावचे ठाणेदार झाले आहे.
आतापर्यंत नियुक्तीच्या प्रतीक्षेत पोलीस नियंत्रण कक्षात बसलेले अशोक चौधरी आर्वीचे ठाणेदार झाले. आर्वी ठाण्यात कार्यरत असलेले ठाणेदार शैलेंद्र साळवी हिंगणघाट ठाण्याचे निरीक्षक झाले आहेत. जिल्हा विकास शाखेत असलेले विलास काळे यांना सेलूचे ठाणे देण्यात आले आहे. तर सेलू येथे तात्पूरत्या प्रभारावर असलेले भास्कर मसराम यांना अल्लीपूर पोलीस ठाणे देण्यात आले आहे. आतापर्यंत दहेगावचे ठाणेदार म्हणून कार्यरत असलेले सुधाकर चव्हाण यांची बदली एटीसी पथकात झाली आहे. दहेगाव येथील ठाणेदार म्हणून अल्लीपूर येथील ठाणेदार भानुदास पिदूरकर यांची वर्णी लागली आहे. नियंत्रण कक्षात असलेल्या शिल्पा भरडे यांच्यावर महिला विशेष सुरक्षा कक्षाचा भार सोपविण्यात आला आहे. बदली झालेल्या कर्मचऱ्यांना तत्काळ रूजू होण्याचे आदेश आहेत.
सिंदी (रेल्वे), रामनगर, सावंगी (मेघे), कारंजा (घाडगे), देवळी, गिरड, समुद्रपूर, वडनेर, खरांगणा व आष्टी (शहीद) या ठाण्यांतील ठाणेदारांच्या बदल्या या सत्रात करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.(प्रतिनिधी)