१२७ आॅटोरिक्षा जप्त
By Admin | Updated: November 6, 2015 03:08 IST2015-11-06T03:08:27+5:302015-11-06T03:08:27+5:30
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने प्रवाशी आॅटोरिक्षा परवाना नुतणीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. या

१२७ आॅटोरिक्षा जप्त
वर्धा : उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने प्रवाशी आॅटोरिक्षा परवाना नुतणीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत खासगी नोंदणी करून प्रवाशी वाहतूक करणारे अनेक आॅटोआॅटोरिक्षा रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले आहे. यामुळे अशा खासगी आॅटोरिक्षाची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. यानुसार वर्धेत एकूण १२७ आॅटोरिक्षांवर जप्तीची काररवाई करण्यात आली.
रस्त्याने धावत असलेल्या अनेक आॅटोरिक्षा चालकांकडील वाहनाच्या परवान्याची मर्यादा संपली असतानाही ते रस्त्यावर धावत आहे. यामुळे राज्य शासनाच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने आॅटोरिक्षाच्या परवाना नुतनीकरण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यानुसार जिल्ह्यात आॅटोरिक्षाची तपासणी करणे सुरू आहे. गत एक महिन्यापासून जिल्ह्यात १९९ आॅटोरिक्षांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे आॅटोचालकांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे.
कारवाईत जप्त करण्यात आलेल्या आॅटोरिक्षांपैकी एकूण ७२ आॅटोरिक्षांना दंड ठोठावण्यात आला आहे. पैकी १९ आॅटो चालकांनी दंडाची रक्कम भरली असून इतर प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांच्याकडून लवकरच दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दंड वसूल केल्यानंतच या आॅटोरिक्षांना सोडण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. शासनाच्या सूचनेनुसार गत महिन्याभरापासून ही कारवाई सुरू आहे. ही कारवाई सुरू असताना जिल्ह्यातील रस्त्यावर धावत असलेले बरेच आॅटोरिक्षा प्रवाशी परवाना नसताना प्रवाशी वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
यात केवळ तीनचाकी आॅटोरिक्षाच नाही तर काही चार चाकी वाहनेही आहेत. अशी वाहने जप्त करण्यात आली असून ती शहर ठाण्याच्या वाहतूक शाखेच्या आवारात ठेवण्यात आली आहे. या वाहनांची खासगी नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. ही मोहीम सतत सुरू राहणार असून जप्त करण्यात आलेल्या आॅटोरिक्षाची संख्या वाढणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. विभागाच्या या मोहिमेबाबत संभ्रम असून आॅटो चालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.(प्रतिनिधी)
७२ वाहनांना दंड
४परिवहन विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील एकूण ७२ आॅटोरिक्षांना दंड ठोठावण्यात आला. त्यांना विविध नियम व कलमान्वये वेगवेगळ्या रकमेचा दंड आकारण्यात येत आहे. जोपर्यंत दंडाची रक्कम भरण्यात येत नाही तोपर्यंत त्यांना वाहनाचा ताबा मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. गत महिन्याभरात राबविलेल्या मोहिेमेत दंड ठोठावण्यात आलेल्या वाहनांपैकी केवळ १९ वाहन चालकांनी दंड भरला आहे. इतर वाहनांकडून अद्याप दंडाची रक्कम भरणे बाकी आहे.
मोहीम राबविण्याकरिता विशेष पथक
४जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत नियमित कर्मचाऱ्यांचा समावेश न करता याकरिता विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामुळे पहिल्याच महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात आॅटोरिक्षा जप्त करण्यात आले. या विशेष पथकामुळे परिवहन विभागाला त्यांच्या नियमित कर्मचाऱ्यांवर विश्वास नसल्याची चर्चा जोरात आहे.