स्कूल मॅपिंग योजनेने जोडल्या तालुक्यातील १२६ शाळा
By Admin | Updated: September 18, 2014 23:39 IST2014-09-18T23:39:15+5:302014-09-18T23:39:15+5:30
सर्व शिक्षा अभियानांतर्गत विविध शैक्षणिक योजना राबविण्यासाठी शासनाला तालुक्यातील शाळांचे स्थान (लोकेशन), संचनालय कार्यालयात किंवा सचिवालय कार्यालयात बसल्या ठिकाणी माहिती व्हावे

स्कूल मॅपिंग योजनेने जोडल्या तालुक्यातील १२६ शाळा
अरुण फाळके - कारंजा (घाडगे)
सर्व शिक्षा अभियानांतर्गत विविध शैक्षणिक योजना राबविण्यासाठी शासनाला तालुक्यातील शाळांचे स्थान (लोकेशन), संचनालय कार्यालयात किंवा सचिवालय कार्यालयात बसल्या ठिकाणी माहिती व्हावे या उद्देशाने कारंजा तालुक्यातील सर्व १२६ शाळा स्कूल मॅपिंग नावाच्या संगणकीय प्रणालीला जोडल्या गेल्या आहेत.
या प्रणालीमुळे तालुक्यातील अत्यंत जवळची किंवा शेवटच्या टोकास असलेली शाळा तालुक्याच्या शहरापासून किती अंतरावर, कोणत्या मार्गावर, मुख्य मार्गापासून किती दूर आहे या सर्व बाबींची परिपूर्ण माहिती मिळेल. शासनाला शिक्षण विकासाची आपली योजना थेट शाळेपर्यंत सहज पोहचविता येईल. कारंंजा तालुक्यात २० माध्यमिक खासगी विद्यालये, चार स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, तीन माध्यमिक शाळांशी संलग्न असलेले कनिष्ठ महाविद्यालय, जि.प. च्या ३६ उच्च प्राथमिक आणि ५९ माध्यमिक शाळा आहेत. या सर्व शाळामध्ये कोणकोणत्या भौतिक व शैक्षणिक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. कोणकोणत्या त्रृटी आहेत याचा शोध घेणारी यु डाईस संगणकीय प्रणाली सन २००९-१० मध्ये सुरू करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर पर्यंतच्या प्रत्येक शाळांची पटसंख्या लक्षात घेवून ३० आॅक्टोबर पर्यंतची यावर्षीची अद्यावत माहिती अपलोड केली जाणार आहे. तालुक्यात स्कूल मॅँपींग प्रणाली सुरू करण्यासाठी प्रभारी गटशिक्षणाधिकारी डी.बी. उमेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विषयतज्ज्ञ आणि केंद्र प्रमुख शिक्षकांनी परीश्रम घेवून या दोन महिन्यात काम पूर्ण केले आहे.