शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात वीज चोरीचे १ हजार २२५ धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची वीज चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 18:34 IST

Wardha : मीटर घेऊनच विजेचा वापर करावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात महावितरणने केलेल्या धडक कारवाईत गेल्या १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात वीज चोरीचे तब्बल १ हजार २२५ गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. या चोरीमुळे महावितरणला १ कोटी ९३ लाख ११ हजार रुपयांच्या १ लाख ३३ हजार ४८९ युनिट विजेचे नुकसान झाले आहे. याव्यतिरिक्त, प्रत्यक्ष गरजेव्यतिरिक्त इतर कारणांसाठी किंवा अप्रत्यक्षपणे वीज वापरणाऱ्या ६० ग्राहकांवरही कठोर कारवाई करण्यात आली आहे. 

महावितरणने वीज चोरीविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतलेल्या या कारवाईमध्ये वर्धा जिल्ह्यातील १ हजार २२५ वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांना चोरीच्या बिलासह दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी १ हजार २१३ ग्राहकांकडून तडजोडीपोटी ३८ लाख १४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, वीज चोरी करणाऱ्यांमध्ये तारांवर आकडा टाकून वीज चोरणाऱ्या ३६५ ग्राहकांचा समावेश आहे, तर ८६० ग्राहकांनी थेट मीटरमध्ये छेडछाड करणे, मीटर बंद पाडणे, रिमोट कंट्रोलने मीटर दुरून बंद करणे, मीटरमध्ये छिद्र पाडून रोध निर्माण करणे किंवा मीटरची गती कमी करणे यासारख्या गैरमार्गाचा अवलंब करून वीज चोरली आहे. यासोबतच, अधिक धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्यक्ष वापराव्यतिरिक्त इतर कारणांसाठी किंवा अप्रत्यक्ष वीज वापरणाऱ्या ६० ग्राहकांनी ३ हजार ५८७ युनिट विजेचा अनधिकृत वापर केला, ज्यासाठी त्यांना ७ लाख ८० हजार रुपयांचे देयक आकारण्यात आले आहे.

वीज चोरीसाठी वापरल्या नवनवीन क्लृप्त्यामोहिमेदरम्यान एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या आर्थिक वर्षाच्या काळात उघडकीस आलेल्या वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये चोरांनी अवलंबलेल्या क्लृप्त्या पाहून अधिकारीही चक्रावून गेले. यात मीटरमध्ये अत्यंत चलाखीने फेरबदल करणे, ते पूर्णपणे बंद पाडणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत रिमोटने मीटर बंद करणे, तसेच मीटरच्या मागील बाजूस छिद्र पाडून त्यात अडथळा निर्माण करून मीटरची गती कमी करणे यासारख्या नवनवीन पद्धतींचा वापर उघडकीस आला आहे.

मीटर घेऊनच विजेचा वापर करावावीज चोरीच्या अनधिकृत विद्युतभारामुळे वीजवाहिन्या आणि रोहित्रांवर क्षमतेपेक्षा जास्त ताण येतो. यामुळे रोहित्र निकामी होणे, शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होणे यासारख्या समस्या उद्भवतात. याचा नाहक त्रास नियमितपणे वीज बिल भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांना सहन करावा लागतो आणि महावितरणलाही मोठा आर्थिक फटका बसतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांच्या रोषालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे, सर्व नागरिकांनी अधिकृत वीज मीटर घेऊनच विजेचा वापर करावा आणि वापरलेल्या विजेच्या बिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

प्रत्यक्ष तपासणीला सुरुवातवीज चोरांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. याअंतर्गत, सदोष मीटर, तसेच सरासरी वीज बिल असलेल्या सर्वच ग्राहकांच्या मीटरची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासोबतच, थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेले आणि सवलत देऊनही अभय योजनेत सहभागी न झालेल्या ग्राहकांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा सर्व ग्राहकांच्या प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात झाली आहे.

टॅग्स :electricityवीजMONEYपैसाbillबिलwardha-acवर्धा