२४ तासात जिल्ह्यात १२२ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:00 AM2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:00:44+5:30

मागील काही दिवसांपासून दमदार पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना होती. अशातच शनिवारी रात्री जिल्ह्यातील आठही तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अंकुरलेल्या सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

122 mm rainfall in 24 hours in the district | २४ तासात जिल्ह्यात १२२ मिमी पाऊस

२४ तासात जिल्ह्यात १२२ मिमी पाऊस

Next
ठळक मुद्देसरासरी १५.३१ मिमी पाऊस : वर्ध्यात सर्वाधिक बरसला, उभ्या पिकांना नवसंजीवनी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील २४ तासांत वर्धा जिल्ह्यात १२२ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. सर्वाधित पाऊस वर्धा तालुक्यात झाला असून जिल्ह्याच्या पर्जन्यमानाची सरासरी १५.३१ इतकी आहे.
मागील काही दिवसांपासून दमदार पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना होती. अशातच शनिवारी रात्री जिल्ह्यातील आठही तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अंकुरलेल्या सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. वर्धा तालुक्यात ३४.३५ मिमी, सेलू ३०.२० मिमी, देवळी ११.१६ मिमी, आर्वी ५.३३ मिमी, आष्टी (शहीद) ६.०० मिमी, कारंजा (घा.) १३.२५ मिमी, हिंगणघाट १५.१० मिमी तर समुद्रपूर तालुक्यात ७.१५ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. मुसळधार पावसादरम्यान पावसाचे पाणी वर्धा शहरासह सिंदी (मेघे) येथील काही नागरिकांच्या घरात शिरले.

मुसळधार पावसामुळे घर कोसळले
वर्धा : शहरातील सानेगुरूजी आर्वी नाका येथील मयुर चंद्रकांत सलामे यांचे घर शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जमिनदोस्त झाले. घरातील जीवनावश्यक वस्तूंची यात नासाडी झाल्याने त्यांचे ८० हजारांचे नुकसान झाले आहे. सर्वेक्षण करून तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांना तालुका प्रशासनाकडे केली आहे.शनिवारी रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस झाला. याच पावसादरम्यान रोजमजुरी करून कुटुंबाचा गाढा ओढणाºया मयुर सलामे यांचे टिनाचे घर जमिनदोस्त झाले. शिवाय पावसाच्या पाण्याने घरातील फ्रिज, टिव्ही, कुलर, सिलिंग फॅन, टेबल फॅन, मिक्सर, टेलरिंगची मशीन, प्रेस, ट्युब लाईट, सेटॉपबॉक्स हे विद्युत उपकरणे भिजल्याने ते निकामी झाले. शिवाय घरातील धान्य व इतर जीवनावश्यक साहित्याची नासाडी झाल्याने त्यांचे सुमारे ८० हजाराचे नुकसान झाले आहे. पावसामुळे झोलेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या तक्रारीतून मयुर सलामे यांनी केली आहे.

Web Title: 122 mm rainfall in 24 hours in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस