१२ शाळेत ५३० विद्यार्थ्यांना प्रवेश

By Admin | Updated: March 16, 2015 01:35 IST2015-03-16T01:35:20+5:302015-03-16T01:35:20+5:30

मोफत व सक्तीचे शिक्षण (आरटीई) या कायद्यानुसार तालुक्यातील १२ शाळांत एकूण ५३० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

12 students attending 530 students | १२ शाळेत ५३० विद्यार्थ्यांना प्रवेश

१२ शाळेत ५३० विद्यार्थ्यांना प्रवेश

आर्वी : मोफत व सक्तीचे शिक्षण (आरटीई) या कायद्यानुसार तालुक्यातील १२ शाळांत एकूण ५३० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. २५ टक्के प्रवेशाकरिता प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम विद्यार्थी निवड यादी २४ ते ३१ मार्च दरम्यान जाहीर होणार आहे.
वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या २५ टक्के जागासाठींची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. वंचित घटकातील बालकांना चांगल्या व उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियमात ही तरतूद करण्यात आली आहे. पालकांकडून पाल्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी आपल्या परिसरातील शाळेतून प्रवेश अर्ज घेऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. या २५ टक्के वंचित घटकासाठी प्रवेश देण्याबाबत शाळांनीही यावर्षी पुढाकार घेतला आहे. यात प्रवेशासाठी विशेष मागासवर्ग, एस.सी., एन.टी. विमुक्त भटक्या जमाती, अपंग असलेले बालक तसेच एक लाखापेक्षा वार्षिक कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 12 students attending 530 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.