शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मंगल कार्यालये, विविध व्यावसायिकांंना १२ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

तुळशी विवाह म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून विवाह सोहळे होत असले तरी एप्रिल, मे महिन्यात खºया अर्थाने लग्नसराईचा हंगाम असतो. चाकरमानी मंडळी, पै पाहुणे यांच्या सुटीचा हा कालावधी असतो. त्यामुळे बहुतांश विवाह सोहळे हे एप्रिल, मे महिन्यातच मोठ्या संख्येने होत असतात. यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच विविध प्रकारचे सोहळे, लग्नसमारंभ, राजकीय कार्यक्रम अशा सर्वावरच बंदी आणण्यात आली.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे ऐन लग्नसराईचा हंगाम गेला हातून : अर्थकारण कोमलमडले, अवलंबित कुटुंबीय अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या प्रादुर्भावाने देशात लॉकडाऊन करण्याची वेळ आली आणि अगदी मजुरीवर काम करणाऱ्या मजुरापासून अब्जावधीची उलाढाल सणाºया उद्योगपतीपर्यंत सर्वच घटकांना मोठा फटका बसला. कोरोनामुळे एप्रिल, मे महिन्यात होणारे ऐन लग्नसराईतील विवाह सोहळे रद्द करण्याची वेळ यजमानांवर आल्याने विवाह मंगल कार्यालये, डेकोरेटर्स, फुलवाले, कापड व्यापारी, सराफा, कॅटरर्स, किराणा मालाचे व्यापारी, फेटेवाले, वाजंत्री यांच्यासह जिल्ह्यातील विविध घटकांना सुमारे १२ कोटींच्या अर्थकारणावर पाणी सोडावे लागणार आहे.आता एप्रिल महिना जवळपास निम्मा संपत आला आहे. लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढले. अशा परिस्थितीत लग्नसराईचा हंगाम पुरता वाया गेला आहे.तुळशी विवाह म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून विवाह सोहळे होत असले तरी एप्रिल, मे महिन्यात खºया अर्थाने लग्नसराईचा हंगाम असतो. चाकरमानी मंडळी, पै पाहुणे यांच्या सुटीचा हा कालावधी असतो. त्यामुळे बहुतांश विवाह सोहळे हे एप्रिल, मे महिन्यातच मोठ्या संख्येने होत असतात. यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच विविध प्रकारचे सोहळे, लग्नसमारंभ, राजकीय कार्यक्रम अशा सर्वावरच बंदी आणण्यात आली. हळूहळू देशासह राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने शाळा, महाविद्यालयांना सुट्या देण्यात आल्या. शासकीय कार्यालयातील उपस्थिती निम्म्यावर आणण्यात आली. तर २२ मार्चला पंतप्रधांनी देशात जनता कर्फ्यू लागू केला आणि त्यानंतर अगदी दोन दिवसांनीच देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या कालावधीत ३० एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. या लॉकडाऊनचा मोठा फटका एप्रिल, मे महिन्यातील विवाह सोहळ्यांना बसला आहे. धूमधडाक्यात लग्नसोहळा साजरा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणसांना एकत्र येण्यावरच बंधने आहेत. अशा पार्श्वभूमीवर लग्नसोहळे, करायचे कसे? नोकरी, धंद्यानिमित्त स्थिरावलेली मंडळी विविध ठिकाणी अडकून पडली आहेत. अशा परिस्थितीत वर्धेत पूर्वनियोजित ठरलेले एप्रिल, मे महिन्यातील विवाह सोहळे रद्द करण्याची वेळ आली आहे. अर्थात लॉकडाऊन कधी उठणार यावरच ते अवलंबून असणार आहे. लॉकडाऊन उठले तरी माणसांच्या संख्येवर निर्बंध येणार आहेत. अशा परिस्थितीत अनेक यजमानांनी विवाह साहळे पुढे ढकलल्याचे शहरातील विवाह मंगल कार्यालयचालकांनी सांगितले.जिल्ह्यात १०० ते १२५ मंगल कार्यालयेजिल्ह्यात लहान-मोठे सुमारे शंभर ते सव्वाशे मंगल कार्यालये आहेत. ग्रामीण भागात अद्याप गावात विवाह सोहळे आयोजित करण्याची प्रथा आहे. साधारणपणे सव्वाशेपैकी ४० ते ५० मंगल कार्यालये सर्वच मुहूर्तासाठी बुक असतात. विवाह सोहळ्याबरोबरच साखरपुडे, मौंज, वाढदिवस असेही कार्यक्रम मंगल कार्यालयांमध्ये होत असतात. साधारणपणे एक विवाह झाला तर त्या मंगल कार्यालयाचे भाडे कॅटरर्स, डेकोरेटर्स, फुलवाले, कापड, किराणा व्यापारी. सराफ, वांजत्री आदी विविध घटकांना सुमारे दीड ते दोन लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळत असते.व्यवसायावर ५० कुटुंब निर्भरलॉकडाऊनमुळे यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात होणारे विवाह सोहळे रद्द करावे लागले. एप्रिल महिन्यात १४, १५, २५ आणि २६ एप्रिल म्हणजे अक्षयतृतीया असे मुहूर्त होते. अक्षयतृतीयेला विवाह सोहळ्यांची संख्या अधिक होती. आतापर्यंत ८ ते १० विवाह सोहळे लागले आहेत. तर मे महिन्यातील १२ दिवस विवाह सोहळ्यांचे मुहूर्त होते. त्यावरही आता सावट निर्माण झाले आहे. जरी एप्रिल आणि मे महिन्यातील लग्नसोहळ्याचे अर्थकारण शक्यता नसल्याने या विविध घटकांना सुमारे १२ कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा मोठा फटका ऐन लग्नसराई हंगामाला बसला आहे. दरवर्षी लग्नसराईत हंगामावेळी एवढे विवाह सोहळे असतात की आम्हाला एरवी नाईलाजास्तव ते सोडावे लागतात. मात्र, यावर्षी लॉकडाऊनमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. एका विवाहसोहळ्यामुळे ५० कुटुंबांना फायदा होत असतो. मात्र, यावर्षी साऱ्यांवरच पाणी सोडावे लागले आहे. लॉकडाऊनच्या काळात या कुटुंबांची जबाबदारीही आली आहे. अनेकांनी पुढील वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये आपले विवाह सोहळे पुढे ढकलले आहेत. त्यामुळे यंदाचा हंगाम आमच्यासाठी कसोटीचा असल्याचे जिल्ह्यातील अनेक मंगल कार्यालयचालक, मालकांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय