११८ बालवैज्ञानिक व ४४ शिक्षकांनी घडविला विज्ञानाविष्कार
By Admin | Updated: December 20, 2015 02:10 IST2015-12-20T02:10:54+5:302015-12-20T02:10:54+5:30
विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होण्यासाठी पंचायत समिती अंतर्गत पुलगावच्या इंडियन मिलिटरी स्कूल येथे देवळी तालुकास्तरीय...

११८ बालवैज्ञानिक व ४४ शिक्षकांनी घडविला विज्ञानाविष्कार
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन : कृष्णा तायल विद्यालयाने तीनही गटात मारली बाजी
पुलगाव : विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होण्यासाठी पंचायत समिती अंतर्गत पुलगावच्या इंडियन मिलिटरी स्कूल येथे देवळी तालुकास्तरीय विज्ञान, शैक्षणिक साहित्य आणि लोकसंख्या शिक्षण साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात तालुक्यातील ११८ विद्यार्थी व ४४ शिक्षकांनी एकूण १६२ वैज्ञानिक प्रतिकृती सादर केल्या.
इंडियन मिलिटरी स्कूलच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम परिसरात पार पडलेल्या या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी एकलव्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मनोज भेंडे तर अतिथी म्हणून संस्थासचिव कृष्णा कडू, नगराध्यक्ष मनीषकुमार साहू, गुंजरखेडा येथील सरपंच वहिदा शेख, प्राचार्य रविकिरण भोजने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाल नारळवार, पं. स. सदस्य मंगला इंगळे आदींची उपस्थिती होती.
या प्रदर्शनात आरोग्य, स्वच्छता, आपातकालीन व्यवस्थापन, लोकस्ांख्या शिक्षण, ज्ञानरचनावादी गणितीय अॅबकस गती व गुणधर्म, डिजीटल प्रयोगशाळा अशा विविध प्रतिकृती सहभागी झाल्या होत्या. प्रदर्शनात विद्यार्थी प्रतिकृती गटात प्राथमिक व माध्यमिक तसेच लोकसंख्याशिक्षण शिक्षक अश्या तीनही गटात पुलगावच्या कृष्णा तायल माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रतिकृती प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
विद्यार्थी प्रतिकृतीच्या प्राथमिक गटात इंडियन मिलीटरी स्कूल द्वितीय, उच्च प्रा. शाळा दरणे टाकळी तृतीय, ज्ञानभारती आर. के. हायस्कूल प्रोत्साहन पुरस्कार, माध्यमिक गटात मॅडमवार विद्यालय टाकळी द्वितीय, ज्ञानभारती पुलगाव तृतीय तर आर.के. यशवंत हायस्कूल प्रोत्साहन पुरस्कार आणि लोकसंख्याशिक्षण शैक्षणिक साहित्य निर्मिती शिक्षक गटात कृष्णा तायल स्कूलच्या पोतले प्रथम, जि.प. शाळा वाघोली चे एस.डी.थुल द्वितीय राहिले. माध्यमिक गटात सुषमा महल्ले प्रथम, रुपाली उघडे द्वितीय ठरल्या. शिक्षक प्रतिकृती गटात बी.डी. चांभारे (सोनोरा), मनोज भेंडे (इंजाळा), प्रिया खरवडे (जामनी), तर माध्यमिक गटात जी.एस.कोरडे (टाकळी), अर्चना राऊत (हिवरा),एन.व्ही.खोडे, पारितोषिकाचे मानकरी ठरले.
प्रयोगशाळा सहायक गटात आर. के. विद्यालयाचे विनोद माहुरे प्रथम तर इंडियन मिलिटरी स्कूलचे नरेश वानरे द्वितीय ठरले. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी एकलव्य शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गजानन उघडे तर अतिथी म्हणून नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर, गटशिक्षणाधिकारी सतीश आत्राम विस्तार अधिकारी खिरोडे, तेलरांधे रेवतकर, प्राचार्य रविकिरण भोजने उपस्थित होते. यशस्वीतेकरिता पर्यवेक्षक नितीन कोठे, एस. कोहळे, एम. लोटे, अतुल साळवे, खंडार आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)