शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

तालुक्यातील ११ शेतकऱ्यांनी कोरले शेतीनिष्ठ पुरस्कारावर नाव

By admin | Updated: February 28, 2015 00:15 IST

बागायती तालुका म्हणून ओळखल्या जात असलेल्या सेलू तालुक्यात पहिला शेतीनिष्ठ पुरस्कार १९६७ मध्ये मिळाला. यात २०१४ पर्यंत एकूण ४८ वर्षांत ११ एकूण शेतकऱ्यांनी शेतीनिष्ठ पुरस्कारावर त्यांचे नाव कोरले.

विजय माहुरे घोराड बागायती तालुका म्हणून ओळखल्या जात असलेल्या सेलू तालुक्यात पहिला शेतीनिष्ठ पुरस्कार १९६७ मध्ये मिळाला. यात २०१४ पर्यंत एकूण ४८ वर्षांत ११ एकूण शेतकऱ्यांनी शेतीनिष्ठ पुरस्कारावर त्यांचे नाव कोरले. असे असले तरी जिजामाता कृषिभूषण व कृषिरत्न पुरस्कारापासून तालुका आजही वंचितच राहिला आहे.शेतातील काळ्या मातीत घाम गाळून धान्य विकविणाऱ्या शेतकऱ्यांची आजची स्थिती बिकट झाल्याचे वास्तव आहे. कधी काळी मिळालेले हे पुरस्कार शेतकऱ्यांना अरज मदत देणारे ठरू शकतात. तालुक्यात १९६७ मध्ये पहिला शेतीनिष्ठ पुरस्काराचे सालई (पेवठ) येथील रामचंद्र आत्माराम अहेर यांनी पटकाविला. शेतीत उत्कृष्ट कार्य, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करणारे, सामाजिक बांधिलकीतून काम, नवनविन पिके घेवून प्रगती करणाऱ्या तसेच सतत तीन वर्ष कृषी पर्यटन यात शेतकऱ्यांचा सहभाग आवश्यक आहे. सोबतच मत्स्य व्यवसाय, दुग्धव्यवसाय, भाजीपाला, फळबाग व फुलबाग घेणारे शेतकरी तसेच गोबर गॅस, सौरशक्ती, निर्धूर चुली, पवन चक्की याही बाबी शेतकऱ्यांना पुरस्कारासाठी केलेल्या अर्जात नमूद कराव्या लागत आहे. यावर पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या कृषी विभागामार्फत पाहणी करून गुण दिले जाते. बागायती तालुका असलेल्या यास परिसरात केळी, ऊस, लांब धाग्याचा कापूस पिकविणारे व नवनवीन पिके घेणारे शेतकरी आहेत. शेडनेट, पॉलीहाऊसच्या माध्यमातून दर्जदार पिके घेण्याकरिता युवा शेतकरी धडपड करीत आहे.या पुरस्कारासाठी प्रस्ताव शेतकरी सादर करीत असताना पंचायत समितीच्या कृषी विभागातील अधिकारी योग्य मार्गदर्शन आवश्यक ुआहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नसल्याने बहुतांश शेतकरी प्रस्तावच सादर करीत नसल्याचे दिसून येत आहे. तालुका कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.