११ कोरोनामुक्त तर सहा नवीन रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:00 IST2020-07-30T05:00:00+5:302020-07-30T05:00:31+5:30

चंद्रपूर येथील हा व्यक्ती उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर बुधवारी जिल्ह्यातील एकूण पाच व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. या पाच कोरोना बाधितांपैकी एक आर्वी तालुक्यातील तर चार वर्धा तालुक्यातील रहिवासी आहे.

11 corona-free and six new patients were found | ११ कोरोनामुक्त तर सहा नवीन रुग्ण आढळले

११ कोरोनामुक्त तर सहा नवीन रुग्ण आढळले

ठळक मुद्देएक कोविड बाधित चंद्रपूरचा : आर्वीत रुग्ण संख्या वाढतीवरच

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बुधवारी अकरा व्यक्तींनी कोरोनावर मात केली असली तरी सहा व्यक्तींचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला आहे. या नव्या कोरोना बाधितांपैकी एक कोरोना बाधित चंद्रपूर जिल्ह्यातील असून त्या रुग्णाची माहिती चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.
चंद्रपूर येथील हा व्यक्ती उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर बुधवारी जिल्ह्यातील एकूण पाच व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. या पाच कोरोना बाधितांपैकी एक आर्वी तालुक्यातील तर चार वर्धा तालुक्यातील रहिवासी आहे. त्यांना उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी दिली. मंगळवारी आर्वी शहरात अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्यात येत आहे. बुधवारी २२३ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात १६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे.

१६४ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा
कोविड चाचणीसाठी आतापर्यंत ७,९५३ व्यक्तींचे स्वॅब पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ७,७८९ व्यक्तींचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून त्यापैकी ७,५८४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सध्या १६४ व्यक्तींच्या अहवालाची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे.
१५० व्यक्तींचे स्वॅब पाठविले तपासणीला
सध्या २४५ व्यक्ती आयसोलेशन वॉर्डात दाखल आहेत. तर बुधवारी १५० व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.

Web Title: 11 corona-free and six new patients were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.