जिल्ह्यात १०.५७ लाख हिंदू तर ५३ हजार मुस्लीम
By Admin | Updated: August 28, 2015 02:14 IST2015-08-28T02:14:23+5:302015-08-28T02:14:23+5:30
शासनाच्यावतीने २००१ मध्ये जनगनना करण्यात आली होती. यानंतर २०११ मध्ये जनगनना करणे गरजेचे होते;

जिल्ह्यात १०.५७ लाख हिंदू तर ५३ हजार मुस्लीम
धर्म आधारित लोकसंख्या जाहीर : बौद्ध धर्मियांची संख्या १.७५ लाख तर साडेपाच हजार जैन धर्मीय
प्रशांत हेलोंडे वर्धा
शासनाच्यावतीने २००१ मध्ये जनगनना करण्यात आली होती. यानंतर २०११ मध्ये जनगनना करणे गरजेचे होते; पण त्यास विलंब झाला. २०११ च्या धर्तीवर देशात जनगनना करण्यात आली. यातील आकडेवारी गतवर्षी जाहीर करण्यात आली होती. बुधवारी केंद्र शासनाकडून धर्मनिहाय लोकसंख्या जाहीर करण्यात आली आहे. यात वर्धा जिल्ह्यातील एकूण १३ लाख ७७४ या लोकसंख्येपैकी १०.५७ लाख एवढी संख्या हिंदू धर्मियांची असून ५३ हजार एवढी लोकसंख्या मुस्लिमांची असल्याचे समोर आले आहे.
वर्धा जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १३ लाख ७७४ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यात हिंदू धर्मियांची संख्या १० लाख ५७ हजार ९६ नोंदविण्यात आली आहे. दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या बौद्ध धर्मियांची १ लाख ७५ हजार ४१७ असून मुस्लीम धर्मियांची संख्या ५३ हजार ८५४ आहे. त्या खालोखाल जैन धर्मियांची संख्या ५ हजार ६६३ असून ख्रिश्चन धर्मिय २ हजार ६९६ तर शीख धर्मिय २ हजार १४७ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शासनाने केलेल्या जनगननेमध्ये जिल्ह्यातील २ हजार २५४ नागरिकांनी आपला धर्म सांगण्यास नकार दिला तर १ हजार ६४७ नागरिकांनी आपला धर्मच माहिती नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे या ३ हजार ९०१ नागरिकांच्या धर्माची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. शासनाच्या धर्माधारित जनगननेमुळे जिल्ह्यातील सर्वधर्मियांची आकडेवारी स्पष्ट झाली आहे.