शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

१०१ टॉवरचे जाळे; सेवा मात्र हॅलो..हॅलो.. पुरतीच

By admin | Updated: February 27, 2017 00:28 IST

भारतीय दूरसंचार निगमचे मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना सुरळीत सेवा देण्याकरिता जिल्ह्यात एकूण १०१ टॉवर उभारले आहे.

बीएसएनएलचे रडगाणे : एक बंद करून होतो दुसरा टॉवर सुरू रूपेश खैरी   वर्धा भारतीय दूरसंचार निगमचे मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना सुरळीत सेवा देण्याकरिता जिल्ह्यात एकूण १०१ टॉवर उभारले आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे जाळे मोठे आहे; मात्र आवश्यक प्रमाणात सेवा पुरविण्याकरिता देखभाल दुरूस्तीचा खोडा आडवा येत आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागात बीएसएनएलचे मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांचा संवाद रेंजअभावी हॅलो.. हॅलो.. पर्यंतच सिमीत राहत असल्याचे वास्तव आहे. बीएसएनएलची टॉवर सेवा सांभाळण्याकरिता जिल्ह्यात केवळ दोन कर्मचारी आहे. या कर्मचाऱ्यांकडून जिल्ह्यात पसरलेले दूरसंचारचे जाळे सांभाळले जात आहे. या दोघांत एक वरिष्ठ आणि दुसरा कनिष्ठ अशी स्थिती आहे. त्यांना मोबाईल टॉवर आणि लॅण्डलाईनचे बिघाड या दोन्हींची देखभाल करावी लागते. केवळ कर्मचारीच नाही तर टॉवरच्या देखभाल दुरूस्तीकरिता आवश्यक साहित्याचीही येथे बोंब आहे. मोबाईल ग्राहकांची अधिक वाहतुकीच्या एखाद्या टॉवरची सेवा विस्कळीत झाली तर तिथे कमी वाहतूक असणाऱ्या टॉवरचे साहित्य काढून लावण्यात येते. यामुळे एकाच्या दुरूस्तीत दुसरा बंद पडतो, अशी स्थिती आहे. या प्रकारातून आतापर्यंत १० टॉवर बंद पडले. केवळ ९१ टॉवर कार्यरत असल्याचे संचारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ९१ टॉवर असतानाही सेवेचे मात्र तीनतेराच वाजले आहे. सध्या सुरू असलेल्या ९१ टॉवरपैकी २३ टॉवर थ्रीजी सेवा पुरविणारे आहेत. तर १६ टॉवर सीडीएमए मोबाईल धारकांना सेवा देत आहेत. उर्वरीत टॉवर टूजी आणि इतर प्रकारातील ग्राहकांना सेवा देत असल्याचे सांगण्यात आले आहे. एवढे मोठे जाळे असताना आता आॅनलाईन होण्याच्या बाता करणाऱ्या शासनाने या शासकीय दुरसंचार कंपनीचे दुखणे दूर करण्याची वेळ आली आहे.