१० ऐवजी मिळणार १२ लाख
By Admin | Updated: November 8, 2015 02:10 IST2015-11-08T02:10:50+5:302015-11-08T02:10:50+5:30
ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नागरिकांना सर्व सुविधा वेळेच्यावेळी मिळाच्या याकरिता ग्रामपंचायतीची इमारत अद्यावत असणे गरजेचे आहे.

१० ऐवजी मिळणार १२ लाख
आदेश : ग्रामपंचायत इमारत बांधकामाच्या अनुदानात वाढ
वर्धा : ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नागरिकांना सर्व सुविधा वेळेच्यावेळी मिळाच्या याकरिता ग्रामपंचायतीची इमारत अद्यावत असणे गरजेचे आहे. हा उद्देश ठेवत इमारत बांधकामाकरिता शासनाच्यावतीन आतापर्यंत देण्यात येत असलेले १० लाख रुपयांच्या अनुदानात वाढ करीत ते १२ लाख रुपये करण्यात आले आहेत.
मंजूर करण्यात आलेले अनुदान ‘ग्रामपंचायतीला जनसुविधांकरिता विशेष अनुदान’ या जिल्हास्तरीय योजनेंतर्गत देण्यात येणार आहे. मिळणाऱ्या या अनुदानात ग्रामपंचायतीची इमारत वा कार्यालय बांधण्यात येणार आहे. जिल्ह्यांच्या विकासाकरिता शासनाच्यावतीने नगरपंचायतींचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या तुलनेत ग्रामपंचायती कमी पडू नये, त्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्या याकरिता ग्रामविकास विभागाने हा निर्णय घेतला आहे. ज्या ग्रामपंचायतींना त्यांची अद्ययावत इमारत नाही त्यांना हा निधी देण्यात येणार आहे. या निधीतून नव्या इमारती बांधणे सोपे होणार आहे.
निधीच्या वितरणाचा आराखडा तयार करण्यात आला असून शासनाच्यावतीने तो संबंधीत विभागाला पाठविल्याचे आदेशात नमूद आहे. दोन लाख रुपयांची भरीव वाढ झाल्याने जिल्ह्याच्या ग्रामपंचायतींचा विकास साधणे शक्य होणार आहे. ग्रामपंचायतीच्या विकासाकरिता इमारत अद्ययावत असणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)
‘ग्रामपंचायतीला जनसुविधांकरिता विशेष अनुदान’ या जिल्हास्तरीय योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्या इमारत वा कार्यालय बांधकामाकरिता असलेल्या अनुदानात दोन लाख रुपयांची भरीव वाढ झाली आहे. या वाढीमुळे जिल्ह्यात असलेल्या ग्रामपंचायतींचा विकास साधणे शक्य होणार असल्याचे विविध गटविकास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. इतारतीच्या विकासाकरिताही हा निधी वापरता येणार आहे.