लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरालगतच्या सावंगी पोलिसांनी मंगळवारी पांढरकवडा येथील पारधी बेड्यावर धाड टाकून १ लाख ३८ हजार ५०० रूपयाचा दारूसाठा जप्त केला तर दुसऱ्या एका प्रकरणात सालोड (हिरापूर) येथील लखन लढी (३३) याच्याकडून ११ हजार २०० रूपयाची गावठी दारू जप्त करण्यात आली. तीन प्रकरणात सावंगी पोलिसांनी १ लाख ४९ हजार ७०० रूपयाचा माल जप्त केला. मंगळवारी सावंगी पोलिसांनी सकाळी पारधी बेड्यावर पांढरकवडा गणेशपूर येथे धाड घालून २७ लोखंडी ड्रमात साठवणूक करण्यात आलेली २५०० लिटर मोहाची दारू जप्त केली. याची किंमत १ लाख ३८ हजार ५०० रूपये आहे. याप्रकरणी गुन्हे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव, पोलीस उपनिरीक्षक दरडे, बिसने, पठाण, साखरे, मोहदुरे, निमजे, काकडे, चाटे, सुरज, राऊत, मुंडे, मोरे, अमोल यांनी पार पाडली तर दुसºया एका प्रकरणात सालोड (हि.) चा लखन लढी याला अटक करण्यात आली. या भागात दारूविक्रेत्याविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे.
१ लाख ५० हजाराचा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 23:34 IST
वर्धा शहरालगतच्या सावंगी पोलिसांनी मंगळवारी पांढरकवडा येथील पारधी बेड्यावर धाड टाकून १ लाख ३८ हजार ५०० रूपयाचा दारूसाठा जप्त केला तर दुसऱ्या एका प्रकरणात सालोड (हिरापूर) येथील लखन लढी (३३) याच्याकडून ११ हजार २०० रूपयाची गावठी दारू जप्त करण्यात आली.
१ लाख ५० हजाराचा दारूसाठा जप्त
ठळक मुद्देसावंगी पोलिसांची कारवाई : सालोडच्या विक्रेत्याला अटक