२ अपघातांत १ ठार, ११ जण जखमी

By Admin | Updated: December 26, 2015 02:12 IST2015-12-26T02:12:46+5:302015-12-26T02:12:46+5:30

नागपूर-अमरावती राष्ट्रीय क्रमांक ६ वर गुरूवारी रात्री व शुक्रवारी दुपारी झालेल्या दोन अपघात झाले. यात एक जण ठार तर अकरा जण जखमी झाले.

1 killed and 11 injured in 2 accidents | २ अपघातांत १ ठार, ११ जण जखमी

२ अपघातांत १ ठार, ११ जण जखमी

तिघांची प्रकृती चिंताजनक : ट्रेलरचे झाले तुकडे; सत्याग्रही घाटात व्हॅनच्या चार पलट्या
तळेगाव (श्या.पं.) : नागपूर-अमरावती राष्ट्रीय क्रमांक ६ वर गुरूवारी रात्री व शुक्रवारी दुपारी झालेल्या दोन अपघात झाले. यात एक जण ठार तर अकरा जण जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथील तर आठ जणांवर आर्वी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नागपूर येथून लोखंडी कॉईल घेऊन ट्रेलर क्र. एम.एच. ४८ जे ६५६ हा मुंबईकडे जात होता. दरम्यान, पालीवाल यांच्या शेताजवळ चुकीच्या दिशेने ट्रॅक्टर क्र. एम.एच. ३२ ए. ८१२५ समोर आला. भरधाव ट्रेलर अनियंत्रीत झाल्याने ट्रॅक्टरला जबर धडक बसली. यात ट्रॅक्टरसह ट्रेलर रस्त्याच्या नालीत पलटी झाले. अपघातात ट्रॅक्टरमधील मजूर युवराज धनराज गुळभेले (३०) रा. जुनीवस्ती तळेगाव हा जागीच ठार झाला. देविदास नेहारे (२७), मोरेश्वर मुरके (२५), रितेश राऊत (२२) हे गंभीर जखमी झाले. जखमींना प्रथम आर्वी उपजिल्हा रुग्णालयात व नंतर नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रॅक्टर चालक हेमंत विठ्ठल बोडखे (३५) रा. तळेगाव, ट्रेलर चालक रामजी यादव (४०) व वाहक राजा पाटील (३०) दोन्ही रा. झारखंड यांना आर्वी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच ठाणेदार दिनेश झामरे, पीएसआय धर्मराज पटले, राजेंद्र कापसे, प्रमोद हरणखेडे, हकीम शेख, अंबादास वैद्य यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस मित्रांच्या मदतीने सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. ट्रेलर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.(वार्ताहर)

महामार्गावर एका आठवड्यात दोन-तीन किमीच्या परिसरात चार गंभीर अपघात झाले. यामुळे परिसर हादरला. ट्रेलर व ट्रॅक्टरच्या अपघातात तर ट्रेलरचे दोन तुकडेच झाले. या अपघातांत तिघांचा बळी गेला तर १७ जण जखमी झाले.
महामार्गाला जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांच्या चौफुलीवर धोकादायक स्थिती आहे. बहुतेक अपघातांत चालकांची हलगर्जीच कारणीभूत ठरली.

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटात वळणावर व्हॅन क्र. एमएच ३१ डीव्ही ८९७७ पटली झाली. यात पाच जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी दुपारी ४ वाजता घडला. योगेश अरविंद ठवकर (३६) हे त्यांची पत्नी पूनम (२७), नेहा शेंडे (२७), किर्ती हजारे (२५), किर्ती बोरकर (३५) सर्व रा. नागपूर यांच्यासह रिसेप्शनकरिता आर्वी येथे येत होते. दरम्यान, मागील टायर पंक्चर झाल्याने वाहन पलटी झाले. तीन-चार पलट्या खाऊन व्हॅन रोडच्या कडेला जाऊन सरळ झाली. जखमींवर आर्वी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Web Title: 1 killed and 11 injured in 2 accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.