दैव बलवत्तर म्हणून वाचले शेतकऱ्यासह बैलांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 06:00 AM2019-11-15T06:00:00+5:302019-11-15T06:00:22+5:30

पांदण रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने बोरखेडी येथील शेतकरी जीव धोक्यात घालून नदीच्या पात्रातून वहिवाट करीत आहे. अशातच शेतकरी लीलाधर चंदीवाले, मुलगा उमेश चंदीवाले हे दोघेही बैलबंडीने शेतात जाण्यासाठी निघाले. जाम नदीच्या पात्राला भरपूर पाणी होते. बाजूला बंधारा असल्याने पाण्याचा अंदाज आला नाही. अशातच शेतकरी लीलाधर पाण्यात पडले.

- | दैव बलवत्तर म्हणून वाचले शेतकऱ्यासह बैलांचे प्राण

दैव बलवत्तर म्हणून वाचले शेतकऱ्यासह बैलांचे प्राण

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या एकीचे बळ मिळाले पाहायला

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : नदीच्या पात्रामधून बैलबंडीसह शेतात जात असताना शेतकरी अचानक पाण्यात वाहून गेला तर बैल व बंडी काळ्या मातीच्या पांदण रस्त्यात फसली. या दोन्ही घटना पाहून जमलेल्या शेतकºयांनी बैलजोडीसह शेतकºयाला वाचविले. बोरखेडी येथे ही घटना घडली.
पांदण रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने बोरखेडी येथील शेतकरी जीव धोक्यात घालून नदीच्या पात्रातून वहिवाट करीत आहे. अशातच शेतकरी लीलाधर चंदीवाले, मुलगा उमेश चंदीवाले हे दोघेही बैलबंडीने शेतात जाण्यासाठी निघाले. जाम नदीच्या पात्राला भरपूर पाणी होते. बाजूला बंधारा असल्याने पाण्याचा अंदाज आला नाही. अशातच शेतकरी लीलाधर पाण्यात पडले. गटांगळ्या खात पोहणी लागले. इकडे त्यांचा मुलगा बैलबंडीवर होता. बैल पळत सुटल्याने गाळात जाऊन फसले. बैलबंडीही पूर्ण फसली. बैलांची अवस्था फारच केविलवाणी झाली होती.
अशातच आजूबाजूच्या शेतात काम करणारे शेतकरी गोळा झाले. त्यांनी आधी लीलाधर यांचा जीव वाचविला. नंतर बैलांना चिखलातून बाहेर काढले. बैलबंडीही बाहेर काढली. यावेळी उद्भवलेली भयावह स्थिती उपस्थितांच्या काळजाचे ठोके वाढविणारी होती. बोरखेडी गावावरून शेताकडे जाणाºया पांदण रस्यासाठी शासनाने अद्याप निधी दिला नाही. त्यामुळे सदर पांदण रस्ता उपेक्षितच असून शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शेतकºयाला व बैलांना वाचविण्यात आले नसते तर चंदीवाले कुटुंबीयांवर मोठा प्रसंग ओढवला असता. निसर्गदेवतेच्या कृपेमुळे ही घटना टळली, अशी प्रतिक्रिया गावकरी व्यक्त करीत होते.

बैलबंडी पोहणी लागल्याने मी पाण्यात वाहून गेलो. माझी काळजी नव्हती मात्र, माझा मुलगा आणि बैल यांचाही जीव टांगणीला लागल्याने समोर मरण दिसत होते. मात्र, शेतकरी देवदूत ठरले आणि आम्ही वाचलो.
- लीलाधर चंदीवाले, शेतकरी, बोरखेडी.

Web Title: -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.