शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडमधील राजकीय समीकरणे बसप घडविणार की बिघडवणार? दरवेळी राहिला तिसऱ्या क्रमांकावर, यंदा काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 10:14 IST

Uttarakhand Lok Sabha Election 2024: उत्तराखंडमधून बहुजन समाज पार्टी अर्थात बसपाचा आतापर्यंत एकही खासदार निवडून आलेला नाही, पण म्हणून या राज्यातील निवडणुकीत बसपचे महत्त्व कमी होत नाही.

- ललित झांबरे डेहराडून - उत्तराखंडमधून बहुजन समाज पार्टी अर्थात बसपाचा आतापर्यंत एकही खासदार निवडून आलेला नाही, पण म्हणून या राज्यातील निवडणुकीत बसपचे महत्त्व कमी होत नाही. कारण देवभूमीतील लोकसभा निवडणुकीत प्रत्येकवेळी बसपाने दखल घेण्याइतपत मते मिळवली आहेत आणि त्यामुळे इथल्या इतर पक्षांच्या उमेदवारांच्या जय-पराजयाची समीकरणे बदलली आहेत. यावेळीसुद्धा बसपाने पाच ही मतदारसंघांत आपले उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळे उत्तराखंडमध्ये यावेळी तिरंगी लढती रंगणार आहेत. 

उत्तराखंडमधील पाचपैकी दोन मतदारसंघांत याच्यापूर्वी बसपाच्या उमेदवाराला विजयाच्या अंतराच्या मतांपेक्षा अधिक मते मिळालेली आहेत. देवभूमीत बसपा हा नेहमीच मतांची टक्केवारी आणि यशाच्या प्रमाणात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. 

या राज्यात २००२ मध्ये पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी बसपने १०.७९ टक्के मते मिळवत सात जागांवर यशसुद्धा मिळवले होते. २००४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी बसपाला मिळालेल्या मतांचे प्रमाण ६.७७ टक्के होते. 

जिंकण्याची शक्यता नसली तरी निकालावर असेल प्रभाव- उत्तराखंडच्या लोकसभा निवडणुकांमध्ये बसपने मिळविलेल्या मतांचे प्रमाण २००४ मध्ये ६.८ टक्के, २००९ मध्ये १५.२ टक्के, २०१४ मध्ये ४.८ टक्के आणि २०१९ मध्ये ५.३ टक्के राहिले आहे. - ही टक्केवारी नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखी नाही म्हणूनच यावेळी बसपाने पुन्हा एकदा पाचही मतदारसंघांत उमेदवार उतरवले आहेत. ते जिंकून येण्याची शक्यता फारच कमी असली तरी कोण जिंकून येणार या समीकरणावर ते निश्चितपणे प्रभाव पाडणार आहेत.

असा हाेता बसपचा इम्पॅक्ट२००९ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाचे पाचही जागांवर उमेदवार होते. त्यावेळी तेहरी गढवाल मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार ५२ हजार मतांनी जिंकला होता, पण याच मतदारसंघात बसपा उमेदवाराला ७४ हजार मते मिळाली होती. गढवालमध्येही असेच घडले होते.काँग्रेसचे विजयाचे अंतर १७ हजार आणि बसप उमेदवाराची मते ३४ हजारांच्यावर होती. हरिद्वार मतदारसंघात तर बसप उमेदवाराने १ लाख ८१ हजार मते मिळवली होती.नैनितालमध्ये त्यांना १ लाख ४३ हजार आणि अल्मोडा मतदारसंघात ४४ हजार मते मिळाली होती. प्रत्येक ठिकाणी बसपाला प्राप्त मते विजयाच्या अंतरापेक्षा अधिक होती. 

टॅग्स :Uttarakhand Lok Sabha Election 2024उत्तराखंड लोकसभा निवडणूक निकाल २०२४Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेसBJPभाजपा