शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वीटभट्टीवरील कच्ची भिंत कोसळून ६ कामगारांचा मृत्यू, ७ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 14:45 IST

अपघातातील जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

उत्तराखंडच्या रुडकी येथील भीषण अपघाताची घटना घडली आहे. मंगलौर तालुक्यातील लहबोली गावात वीटभट्टीवरील कच्चे बांधकाम असलेली भिंत कोसळून ६ कामगारांचामृत्यू झाला. सकाळी सकाळी वीटभट्टीवर कामासाठी आलेल्या मजुरांच्या अंगावर ही भिंत कोसळल्याने अपघात झाला. त्यामध्ये, भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबून ६ कामगारांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

अपघातातील जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लक्सर येथील आमदार मोहम्मद शहजाद, पोलीस अधीक्षक यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू करण्यात आले. लहबोली गावात विटभट्टी कारखानदारी आहे. येथे जवळपास १०० पेक्षा अधिक कामगार काम करतात. यावेळी, कच्च्या विटांची भट्टीत भरणी करण्याचं काम सुरू होतं. त्याचवेळी, भिंत कोसळून दुर्घटना घडली. 

या कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली तेथील ८ ते १० कामगार दबले. या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर, आजुबाजूच्या परिसरातील कामगारही मदतीसाठी धावले. जेसीबी आणि हातांनी विटांना बाजूला सारुन दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दुर्घटनेत ६ कामगारांना आपला जीव गमवावा लागला. 

या दुर्घटनेत मुकुल, साबिर, अंकित, बाबूराम आणि जग्गी यांचे जागेवरच मृत्यू झाला. तसेच, आशु, समीरसह ५ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार मोहम्मद शहजाद, एसपी एस.के सिंह, एसडीएम विजयनाथ शुक्लांसह अधिकारी घटनास्थळी पोहोचले. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडAccidentअपघातDeathमृत्यूLabourकामगार