शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत होतेय योगी सरकारची कॅबिनेट बैठक; आधी रामलल्लाचे दर्शन, मग घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 11:55 IST

अयोध्येसाठी योगी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

वाराणसी - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात प्रथमच अयोध्येत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यासाठी, अयोध्या नगरी चांगलीच सजविण्यात आली असून श्री राम आणि हनुमान यांची कमान बैठकीच्या ठिकाणी उभारण्यात आली आहे. या बैठकीपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी मंत्रीमंडळातील सर्वच सदस्यांसह हनुमान गढी येथे जाऊन दर्शन घेतले. तर, अयोध्येतील रामलल्लांचीही पूजा-आरती केली. त्यामुळे, आजच्या बैठकीत नेमके कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार, अयोध्येसाठी योगी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

योगी आदित्यनाथ हे आपल्या मंत्रिमंडळासह अयोध्या नगरीत पोहोचले असून त्यांनी सर्वप्रथम हनुमान गढी येथे जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर, येथील प्रभू श्रीराम जन्मभूमी स्थळावर जाऊन रामलल्लाचेही दर्शन घेतले. त्यानंतर, आज सर्वच सदस्यांसह येथे मंत्रिमंडळाची बैठक होत असून या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काय घोषणा करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ११ नोव्हेंबर रोजी येथे मोठा दिपोत्सव होणार आहे. त्याच्या एक दिवस अगोदरच येथे बैठकीचं आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश सरकारचं मंत्रालय आणि विधानभव लखनौमध्ये आहे. तरीही, यंदा प्रथमच अयोध्येत  मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात येथील आंतरराष्ट्रीय रामकथा संग्रहालयात ४ तास बैठक होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. तसेच, या बैठकीत अयोध्या तीर्थ विकास परिषद, देवीपाटन धाम तीर्थ विकास परिषद आणि मुजफ्फरनगर येथील शुक्रताल धाम तीर्थ विकास परिषदेच्या स्थापनेला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यासह, अयोध्या आणि पुढील २ महिन्यात होत असलेल्या राम मंदिरा लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर आणखी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या जाऊ शकतात.    

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या