शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
3
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
4
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
5
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
6
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
7
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
8
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
9
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
10
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
11
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
12
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
13
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
14
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
15
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
16
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
17
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
18
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
19
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
20
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 

'आम्ही स्वदेशासाठी जगू अन् देशासाठी मरू; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशभक्तीचे केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:18 IST

मुख्यमंत्री योगी म्हणाले, तिरंगा प्रत्येक घरात पोहोचला पाहिजे, स्वदेशी जीवनाचा मंत्र बनला पाहिजे.

लखनौ: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी काकोरी ट्रेन अॅक्शन शताब्दी सोहळ्याच्या समारोपप्रसंगी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी सध्याच्या पिढीला देशभक्ती आणि स्वदेशी स्वीकारण्याचे आवाहन केले. "स्वदेशी आपल्या जीवनाचे ध्येय बनले पाहिजे, स्वदेशी आपल्या जीवनाचा मंत्र बनला पाहिजे, आपण स्वदेशीसाठी जगू, आपण आपल्या देशासाठी मरू. जेव्हा भारत देशभक्तीच्या या उंचीने पुढे जाईल, त्यावेळी जगातील कोणतीही शक्ती भारताचे नुकसान करू शकणार नाही. स्वातंत्र्याचा हा संदेश आपल्या सर्वांना या उद्दिष्टाने पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहे",असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काकोरी रेल्वे हल्ल्यात शहीद झालेल्या देशाच्या सुपुत्रांना अभिवादन केले.  त्यांनी कार्यक्रमस्थळी पिंपळाचे झाडही लावले. त्यांनी लहानांना राखी बांधली आणि मुलींना मिठाई आणि चॉकलेट भेट दिली. त्यानंतर त्यांनी संग्रहालयात सेल्फी आणि फोटोशूट देखील केले. मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान केला, तर काकोरी रेल्वे हल्ल्याच्या घटनेवर आधारित पुस्तकाचे प्रकाशनही केले. या दरम्यान, संस्कृती विभागाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

काकोरी क्रांतिकारकांनी देशभक्तीची ज्योत पेटवली

यावेळी आपल्या भाषमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरी येथे ब्रिटीश सरकारच्या तिजोरीवर कब्जा त्यांनी केला. त्या पैशाचा वापर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात केला. महान क्रांतिकारकांनी पेटवलेल्या देशभक्तीच्या ज्योतीमुळे १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला.  रेल्वे कारवाईत फक्त ४६०० रुपये लुटले  होते, परंतु ब्रिटिश सरकारने त्यांना पकडण्यासाठी १० लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला होता, असंही त्यांनी सांगितले. 

"त्या क्रांतिकारकांना खटल्याशिवाय फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद ब्रिटिश सरकारच्या हाती लागले नाहीत, तर त्यांनी स्वतः लढून शहीद झाले. आजचा हा शताब्दी उत्सव त्या महान क्रांतिकारकांना आठवण्याचा एक उत्तम दिवस आहे. आपल्या सध्याच्या पिढीसाठी ही एक नवीन प्रेरणा आहे. १०० वर्षांपूर्वी या महान स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना आठवण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक देशवासीयाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश