शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या छतावर उभं राहून नवरदेवाचा स्टंट; व्हिडीओ व्हायरल अन् SUV जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 14:27 IST

गाडीवर बसून लग्नाचं फोटोशूट करणं नवरदेवाला चांगलंच भोवलं.

गाडीवर बसून लग्नाचं फोटोशूट करणं नवरदेवाला चांगलंच भोवलं. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये चक्क गाडीवर उभं राहून व्हिडीओ काढल्याप्रकरणी पोलिसांनी नवरदेवावर कारवाई करण्यात आली. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर एका एसयूव्ही कारच्या छतावर नवरदेव उभा असल्याचे दिसते. हा प्रकार उत्तर प्रदेश पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने कारवाई करत एसयूव्ही जप्त केली.

माहितीनुसार, अंकित नावाचा व्यक्ती सहारनपूरच्या भैला गावातून लग्नाची मिरवणूक घेऊन मेरठच्या कुशावली गावात जात होता. दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्गावर येताच नवरदेवाला गाठीच्या वरती उभं करून फोटोशूट सुरू होतं. वराचा हा स्टंट रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांचं लक्ष वेधत होता. पण ड्रोन कॅमेऱ्यानं केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करणं नवरदेवाला महागात पडलं. व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि वराला स्टंट करताना पाहून फुलांनी सजवलेली गाडी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणली. महामार्गावर पुन्हा स्टंट करू नका, असा सल्ला देऊन पोलिसांनी वऱ्हाडी मंडळीला देऊन गाडी परत केली. 

व्हिडीओ व्हायरल अन् कारवाई स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, आम्हाला एक नवरदेव गाडीवर उभा राहून स्टंट करत असल्याची माहिती मिळाली. व्हिडीओ देखील आम्ही पाहिला. मग राष्ट्रीय महामार्ग ५८ वरील नवरदेवाची मिरवणूक थांबवण्यात आली आणि गाडी जप्त केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. स्टंटबाजीमुळं नवरदेवाला नेण्यासाठी फुलांनी सजवलेली गाडी पोलीस ठाण्यात अडकली. त्यामुळं जागीच दुसऱ्या गाडीची व्यवस्था करून वरासह लग्नाची मिरवणूक वधूच्या घराकडे न्यावी लागली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशStuntmanस्टंटमॅनSocial Viralसोशल व्हायरल