शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 19:16 IST

विमानतळावर उतरल्यानंतर इरॉल मस्क यांनी माध्यमांसमोर शुद्ध भारतीय शैलीत उपस्थित लोकांचे अभिवादन केले...

अमेरिकन उद्योगपती तथा टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क सध्या भारत दौऱ्यावर आहेत. ते बुधवारी दुपारी रामनगरी अयोध्येत पोहोचले. यानंतर ते आपल्या कुटुंबासह रामललांचे दर्शन घेण्यासाठी राम मंदिरात पोहोचले. त्यांचे चार्टर्ड विमान दुपारी २:१५ वाजता महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. कडक सुरक्षा व्यवस्थेत त्यांना रामललांच्या दर्शनासाठी नेण्यात आले. अयोध्येत त्यांची एक झलक पाहण्यासाठी भाविकांमध्ये स्पर्धा दिसून आली. 

विमानतळावर उतरल्यानंतर इरॉल मस्क यांनी माध्यमांसमोर शुद्ध भारतीय शैलीत उपस्थित लोकांचे अभिवादन केले. हनुमानगढीचे महंत हेमंत दास यांच्या उपस्थितीत त्यांनी जय श्री राम असा जयघोष केला. विमानतळ जय श्री रामच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. यावेळी भारतातील गुंतवणूक योजनेसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरही त्यांनी सकारात्मक उत्तर दिले. माझा हा दौरा गुंतवणुकीच्या संदर्भातच आहे, असे ते म्हणाले. भारतीय संस्कृतीचे कौतुक करताना, भारतीय संस्कृती आणि परंपरेला एक गौरवशाली इतिहास आहे, मी त्याचा आदर करतो, असेही ते म्हणाले.

यावेली बोलताना तीर्थ क्षेत्र कोषाध्यक्ष महंत श्री गिरी म्हणाले, राम ललांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी देशातील विविध भागातील सेलिब्रिटी पोहोचले होते. याशिवाय, देशांतर्गत आणि परदेशी राजदूत तथा विविध सरकारांमधील प्रभशाली नेतेही पोहोचले होते. आता राजा राम यांची प्रतिष्ठापना होत असताना, जगातील सर्वात श्रीमंत अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क हे देखील बुधवारी अयोध्येत पोहोचले. ही सर्व लक्ष्मीपती विष्णूजींचा अवतार असलेल्या प्रभू श्रीराम यांचीच कृपा आहे. 

 

 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कUttar Pradeshउत्तर प्रदेशAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर