शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Train Accident: उत्तर प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना, पातालकोट एक्स्प्रेसला आग, दोन डबे जळाले, अनेकजण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 20:00 IST

Burning Train In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील आग्र्याजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. येथे एका धावत्या ट्रेनला आग लागली आहे. पातालकोट एक्स्प्रेसला झालेल्या या अपघातात ट्रेनच्या दोन डब्यांना आग लागली आहे. ट्रेनला नेमकी आग कशी लागली हे समजू शकलेलं नाही.

उत्तर प्रदेशमधील आग्र्याजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. येथे एका धावत्या ट्रेनला आग लागली आहे. पातालकोट एक्स्प्रेसला झालेल्या या अपघातात ट्रेनच्या दोन डब्यांना आग लागली आहे. ट्रेनला नेमकी आग कशी लागली हे समजू शकलेलं नाही. मात्र आग लागल्यानंतर ट्रेनमधील प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला.

ही दुर्घटना मालपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भडाई रेल्वेस्टेशनजवळ घडली आहे. रेल्वेच्या पीआरओंनी अपघाताची माहिती देताना सांगितले की, ट्रेनच्या दोन डब्यांमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. दरम्यान, या आगीमध्ये ट्रेनमधून प्रवास करणारे अनेक प्रवासी होरपळल्याची प्राथमिक माहिती आहे.

ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांना एसएन मेडिकल कॉलेजमधील आपातकालीन विभागात दाखल करण्यात आले आहे. तिन्ही प्रवासी हे १० ते १५ टक्के होरपळले आहेत. सर्वांना एसएन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.या अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आगीमागचं कारण अद्यापतरी कळू शकलेलं नाही. तर दोन दब्यांना लागलेल्या आगीमुळे ही ट्रेन घटनास्थळावरच थांबवावी लागली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ट्रेन आग्रा कँट रेल्वे स्टेशनवर पोहोचली आणि तिथून झाशीकडे रवाना झाली. काही किमी अंतरावर गेल्यावर ट्रेनच्या जनरल बोगीमध्ये धूर आणि आग दिसू लागली. त्यामुळे प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. आगीची माहिती मिळताच ड्रायव्हरने ट्रेन थांबवली आणि कंट्रोल रूमला माहिती दिली.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश