शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी दुर्घटना; पाण्यात बुडून 6 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 10:48 IST

मार्कण्डेय  ऋषी मंदिराजवळील तलावात पाच जण बुडाले. हे पाहून घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पाण्यात बुडणाऱ्या लोकांना बाहेर काढलं तोपर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला होता.

उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे गणपती विसर्जनाच्या वेळी मोठी दुर्घटना घडली आहे. मार्कण्डेय ऋषी मंदिराजवळील तलावात पाच जण बुडाले. हे पाहून घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पाण्यात बुडणाऱ्या लोकांना बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला होता. एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सैफई पीजीआयमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

ही संपूर्ण घटना जिल्ह्यातील घिरोर शहरातील ऋषी मार्कण्डेय मंदिर परिसरात बांधलेल्या विधूना कुंडात घडली. जिथे गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी आलेले पाच जण तलावात बुडाले. हे पाचही जण तलावात अंघोळ करण्यासाठी उतरले होते. मात्र त्यानंतर ही घटना घडली. त्यांना बुडताना पाहून घटनास्थळी एकच गोंधळ झाला.

एका तरुणाला वाचवण्यात यश आले तर 4 जण बुडाले. त्यांना बाहेर काढले, तोपर्यंत त्यातील 3 जणांचा मृत्यू झाला होता. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला सैफई मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. आग्रा येथेही अशीच घटना घडली आहे. तर गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी मंडी सईद खान येथे राहणारे पाच तरुण बुडाले. यातील दोन तरुणांना वाचवलं मात्र तीन जणांना वाचवता आलं नाही. नंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, यमुनेमध्ये मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मंडीतील काही तरुण शाहिद खान टेम्पोने पोईया घाटावर आले होते. मात्र त्यांना पाण्याच्या खोलीची कल्पना नसल्याने ते बुडू लागले. त्यांनी आरडाओरड सुरू केल्यावर लोकांच्या लक्षात आलं. कैलास घाट, पोईया घाट, बाळकेश्वर घाट, हाती घाट येथे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तरुण विसर्जनासाठी दुसऱ्या ठिकाणी पोहोचले जिथे ना पोलीस होते ना कुठली यंत्रणा होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश