शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही, ही निव्वळ फसवणूक; माजी मंत्र्यांच्या विधानाने वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 14:31 IST

"हिंदू धर्म जर या समाजात असता तर..."

Controversial Statement about Hindu Religion: "हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही. हिंदू धर्म ही केवळ फसवणूक आहे. ब्राह्मण धर्माला हिंदू धर्म म्हणण्याचा हा डाव आहे", असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले. लखनौमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. "हिंदू धर्म असता तर आदिवासींनाही आदर मिळाला असता. सर्व विषमतेचे कारण ब्राह्मणवाद आहे. दलित आणि आदिवासींना जाळ्यात अडकवण्याचा हा प्रयत्न आहे. ब्राह्मणवादाची मुळे खूप खोलवर रूजवलेली आहेत. हिंदू धर्म असता तर या समाजात मागासलेल्यांचा सन्मान झाला असता, पण आदिवासी समाजातून येणाऱ्या राष्ट्रपतींना मंदिरात जाण्यापासून रोखले जाते ही तर मोठी शोकांतिका आहे", असेही ते म्हणाले.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी सोमवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ ट्विट केला. चार मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये मौर्य हिंदू धर्माच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसले. "द्रौपदी मुर्मू जी राष्ट्रपती झाल्यानंतरही त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आले, कारण त्या आदिवासी समाजातील आहेत. आदिवासी समाज हिंदू असता तर त्यांना अशी वागणूक दिली असती का? ब्राह्मण देवतांचे चतुर लोक अजूनही आम्हाला आदिवासीच मानतात. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याबाबतही असेच घडले आहे. ज्याला तुम्ही हिंदू धर्म म्हणता, तुमचे सर्वस्व अर्पण करता, हिंदू-मुस्लीम असे वाद होऊन दंगली करता, रक्त सांडता, ते केवळ तुमचे अज्ञान आहे," असे मौर्य म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गंगाजलाने धुण्याबाबत...

'जेव्हा अखिलेश यादव मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले, तेव्हा या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गोमूत्राने धुतले. एवढ्यानेही मन तृप्त झाले नाही, तेव्हा घराला गंगाजलाने आंघोळ घालण्यात आली. एखाद्या ब्राह्मण मुख्यमंत्री असता तर त्यानंतर घराला गोमूत्र आणि गंगाजलाने धुण्याची हिंमत कुणाची असती का? अखिलेश यादव यांचा जन्म मागासलेल्या समाजात झाल्यामुळे त्यांच्याबाबत असे करण्यात आले. आदिवासी-दलित आणि मागास हे कोण आहेत, ज्यांना पूर्वी शूद्र म्हटले जात होते. त्यांना प्राण्यांपेक्षाही वाईट जीवन जगण्यास भाग पाडले जात होते. त्यामुळे सावध राहा, तुम्ही ज्याला धर्म मानता तो त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्यासाठी व्यवसाय म्हणजे तुमची फसवणूक आहे", असेही ते म्हणाले.

टॅग्स :HinduहिंदूUttar Pradeshउत्तर प्रदेशministerमंत्रीSamajwadi Partyसमाजवादी पार्टी