शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत दुमदुमला महाराष्ट्राचा आवाज...; पाहा, ढोल-ताशांचा हा मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 15:18 IST

श्रीरामाच्या दरबारी महाराष्ट्रातील ढोल, ताशाचा गजर पाहायला मिळाला.

अयोध्या : अयोध्येतील मंदिरामध्ये रामचंद्राच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर भगवान श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्याधाममध्ये लोकांची गर्दी होऊ लागली आहे. मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यातच श्रीरामाच्या दरबारी महाराष्ट्रातील ढोल, ताशाचा गजर पाहायला मिळाला. यासंबंधीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राम मंदिर परिसरात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात पुण्यातील श्रीराम पथकाच्या ढोल, ताशाच्या वादनाने अयोध्यानगरी मंत्रमुग्ध केली. पुण्याच्या संस्कृतीचे अयोध्येत प्रदर्शन करून श्रीराम पथकाने ढोल-ताशाच्या वादनाने रामललाच्या चरणी आपली सेवा अर्पण केली आहे. याचबरोबर, या पथकाला काशी विश्वेश्वर येथील मंदिराच्या परिसरातही वादन करण्याची संधी देण्यात आली आहे. या श्रीराम पथकामध्ये ५० ढोल, २५ ताशा आणि ध्वज असून पथकाच्या अनेक सभासदांनी अयोध्येत हजेरी लावली.

अयोध्येतील राम मंदिराचे उद्‍घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्यात भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. मंदिर परिसरातच लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे भाविकांना सुरक्षेच्या अनेक फेऱ्या पार कराव्या लागत आहेत. मंदिर आणि परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सध्या अयोध्येत फक्त त्या वाहनांना परवानगी आहे, ज्यांच्याकडे आधीच 'पास' आहेत. शहरात ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

दरम्यान, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या जवळपास दोन आठवड्यांपूर्वी अयोध्येतील हॉटेल बुकिंग ८० टक्क्यांनी वाढले आहे. येथे हॉटेलमधील एका दिवसाच्या खोलीची किंमत सर्वकालीन उच्च दरावर पोहोचली आहे, जी पाच पटीने वाढली आहे. काही आलिशान खोल्यांचे भाडे एक लाख रुपयांपर्यंत गेले आहे. विशेष म्हणजे भाड्यात एवढी वाढ होऊनही हॉटेल बुकिंग दररोज वाढत आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र