शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
3
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
4
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
5
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
6
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
7
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
8
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
9
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
10
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
11
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण
12
Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
13
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 
14
शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी अखेर शमली, दोन्ही गटांचे अखेर मनोमिलन! दादा भुसेंच्या मध्यस्थीला यश
15
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
16
कोणी बोलल्यावर आपण हसलो तर आरोपी होतो का?
17
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
18
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
19
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
20
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...

मुलावर संस्कार करू शकत नसाल तर...; राहुल गांधींनंतर आता सोनिया गांधींनाही स्मृती इराणी यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 15:51 IST

राहुल गांधी म्हणाले होते, 'मी वाराणसीला गेलो होतो, तेव्हा बघितले, रात्रीच्या वेळी बाजा वाजत आहे आणि दारू पिऊन यूपीचे भविष्य रस्त्यावर पडलेले आहे. तेथे यूपीचे भविष्य दिरू पिऊन नाचत आहे.

राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यातील राजकीय कलगीतुरा सर्वांनाच माहीत आहे. आता तो पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अमेठी आणि रायबरेली येथे पोहोचली आहे. तसेच, भाजप नेत्या स्मृती इराणीही त्यांच्याच लोकसभा मतदारसंघात आहेत. यातच, राहुल गांधी यांचे एक विधान समोर आले आहे. यात त्यांनी, वाराणसीतील तरुण दारू घेऊन रस्त्यावर पडतात आणि रात्री डान्स करतात, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरूनच आता स्मृती इराणी यांनी निशाणा साधला असून त्यांनी यूपीतील तरुणांचा आणि पुण्य स्थळांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही, तर त्यांनी सोनिया गांधींवरही हल्ला चढवत, जर आपण आपल्या मुलाला योग्य संस्कार देऊ शकत नसाल, तर बोलण्यापासून तरी रोखा, असे म्हटले आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी - राहुल गांधी म्हणाले होते, 'मी वाराणसीला गेलो होतो, तेव्हा बघितले, रात्रीच्या वेळी बाजा वाजत आहे आणि दारू पिऊन यूपीचे भविष्य रस्त्यावर पडलेले आहे. तेथे यूपीचे भविष्य दिरू पिऊन नाचत आहे. दुसरीकडे आपल्याला राम मंदिरात नरेंद्र मोदी दिसतील, अंबानी दिसतील, अदानी दिसतील. भारतातील अब्जाधीश दिसतील. मात्र कुणी मागास, दलित, आदिवासी दिसणार नाही. ती तुमची जागा नाही. तुमची जागा रस्त्यावर भीक मागण्याची आणि पोस्टर दाखविण्याची आहे. त्यांचे काम पैसे मोजायचे आहे.'

इराणींचं प्रत्युत्तर -राहुल गांधी यांच्या याच वक्तव्यावरून इराणी यांनी निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, "राहुल गांधी यांच्या मनात उत्तर प्रदेशसाठी किती विष भरलेले आहे, हे त्यांच्या अशा अभद्र टिप्पणी वरून लक्षात येते. राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये जाऊनही उत्तर प्रदेशातील जनतेबद्दल वाईट भाष्य केले. त्यांनी रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रणही नाकारले होते आणि ते आज काशीच्या युवकांसंदर्भात अभद्र टिप्पणी करत आहेत. मी तर म्हणेन की, काँग्रेसचे भविष्य अंधकारात आहे. मात्र उत्तर प्रदेसचे भविष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. येथे कालच इन्व्हेस्टमेंट समीट झाली. माझा सोनिया गांधींना सल्ला आहे की, जर आपण आपल्या मुलाला चांगले संस्कार देऊ शकत नसाल, तर त्यांनी आमच्या पुण्य स्थळांसंदर्भात आक्षेपार्ह भाष्य करणे बंद करावे."

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा