शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

'या' चित्रपटात दिसणार सीमा हैदर; दिग्दर्शकांनी घेतली ऑडिशन! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 22:11 IST

या चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत सिन्हा आणि भरत सिंह करत आहेत.

सीमा हैदर आणि सचिन मीना यांची प्रेमकहाणी सध्या चांगलीच गाजत आहे. आता सीमा हैदर मोठ्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. चित्रपटाचे नाव आणि तिची भूमिका जवळपास निश्चित झाली आहे. राजस्थानमधील उदयपूर येथील शिंपी कन्हैया लालच्या हत्येवर हा चित्रपट तयार होणार आहे. ' A Tailor Murder Story' असे या चित्रपटाचे नाव आहे. यामध्ये सीमा हैदर एका रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत सिन्हा आणि भरत सिंह करत आहेत. त्यांनी सीमा हैदरची ऑडिशन घेतली आहे. हा चित्रपट Jani Firefox प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनवला जाणार आहे. चित्रपट निर्माते अमित जानी यांनी बुधवारी सीमा हैदर हिची भेट घेतली आणि श्रीफळ व शाल दिली. दरम्यान, सीमा आणि सचिनचे कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करत असल्याची बातमी समोर येताच त्यांना अमित जानी यांनी चित्रपटात कामाची ऑफर दिली होती.

सीमा हैदर आणि सचिन मीना यांची प्रेमकहाणी भारतापासून पाकिस्तानपर्यंत चर्चेत आहे. त्यांची प्रेमकहाणी सोशल मीडियावर सुद्धा चांगलीच गाजत आहे. मात्र सीमा प्रेमासाठी आली की काही दुसऱ्या हेतूने आली याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. सीमा पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय काही लोकांकडून व्यक्त केला जात आहे. पण हे अजून सिद्ध झालेले नाही. याबाबत भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून सीमा हैदरची चौकशीही करण्यात येत आहे. 

उत्तर प्रदेश एटीएसने अलीकडेच सीमा, सचिन आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. सचिनची घरची परिस्थीती आधीच हालाखीची आहे, त्यात आता सीमा आणि तिची चार मुलं, यांचा सांभाळ देखील सचिनलाच करायचा आहे. दोघांची चौकशी सुरु असल्याने सीमा आणि सचिनला कामासाठी घराबाहेर जात येत नाही आहे. त्यामुळे सचिनच्या हातातील कामही गेलं असून आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अमित जानी यांनी सीमा व सचिनला आपल्या प्रोडक्शनमध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. 

सीमा-सचिनला गुजरातमध्ये नोकरीची ऑफर!उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधील रबुपूर गावात सोमवारी रात्री उशिरा पोस्टमन एक अज्ञात पत्र घेऊन सचिन-सीमा यांच्या घरी पोहोचला. अज्ञात पत्र पाहून एकच खळबळ उडाली. सीमाला पत्र उघडायचे होते, पण तिच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांनी तिला ते उघडण्यापासून रोखले. ते धमकीचे पत्र असू शकते असे पोलिसांना वाटले. यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे पत्र उघडले असता, ते गुजरातमधील एका व्यावसायिकाने सचिन आणि सीमा यांना लिहिले असल्याचे आढळून आले. तीन पानी पत्रात सीमा आणि सचिन यांना गुजरातमध्ये प्रत्येकी ५० हजार रुपये पगारावर नोकरीची ऑफर देण्यात आली होती. वर्षानुसार बघितले तर त्यांना वर्षाला प्रत्येकी ६ लाख रुपयांची नोकरीची ऑफर मिळाली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशbollywoodबॉलिवूड