शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री योगींच्या हाती रायफल, निशाणा कोणावर; मानले मोदींचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 17:19 IST

सैन्य दलाच्या मध्य कमान येथील आयोजित तीन दिवसीय नो युवर आर्मी फेस्टीव्हलचा शुभारंभ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याहस्ते करण्यात आला.

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी सैन्य दलाच्या  लखनौमधील कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी, हाती रायफल बंदूक घेऊन निशाणाही धरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी, त्यांनी तेथील आधुनिक शस्त्रास्त्रांची माहितीही सैन्यातील अधिकाऱ्यांकडून घेतली. भारतीय सैन्य दल देशातील १४० कोटी भारतीयांच्या शौर्य आणि ताकदीचं प्रतिक आहे. एक शक्तीशाली सैन्यच सुरक्षित व संप्रभु राष्ट्राच्या संकल्पनेला साकार करू शकते, असे यावेळी योगींनी म्हटले. 

सैन्य दलाच्या मध्य कमान येथील आयोजित तीन दिवसीय नो युवर आर्मी फेस्टीव्हलचा शुभारंभ मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी, रंगबेरंगी फुगे आकाशात सोडण्यात आली. त्यानंतर, योगी आदित्यनाथ यांनी येथील प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या सैन्य दलाच्या विविध शस्त्रांची पाहणी केली. त्यामध्ये, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचाही समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी सैन्यातील अधिकाऱ्यांकडून शस्त्रास्त्रांची माहिती घेतली. यावेळी, रायफल हातात घेऊन, एक डोळा झाकून निशाणाही साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे.

देशाच्या राजधानीबाहेर पहिल्यांदाच सैन्य दलाच्या नो युवर आर्मी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबद्दल योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांना धन्यवाद दिले. यावेळी, मुख्यमंत्री योगी यांनी शिख रेजीमेंटने दाखवलेल्या शौर्य कसरतींचे कौतुक केले. आपल्या भारतीय प्राचीन कलेचा नमुना या प्रदर्शनातून पाहण्यात आला. ज्यामध्ये शत्रूराष्ट्राल जशास तसे उत्तर देण्याची ताकत आहे, असेही योगींनी म्हटले.  दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही या भेटीतील फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये, त्यांच्या हाती रायफल दिसून येते.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथChief Ministerमुख्यमंत्रीlucknow-pcलखनऊBJPभाजपा