शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

राजपथावर दिसले रामलला; प्रजासत्ताक दिनाचा अभूतपूर्व सोहळा, यंदा नवी सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 12:37 IST

विकसित भारत आणि भारत-लोकतंत्र की मातृका या थीमवर आधारित यंदाचा परेडसोहळा होत आहे.

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असून राजधानी दिल्लीतील राजपथावर देशाचा सोहळा संपन्न होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते झेंडा फडकवल्यानतंर देशभरातील सर्वच ठिकाणी ध्वजारोहण झाले. राजपथावर यंदा दैदिप्यमान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मूंसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मैक्रों यांच्यासह दिगग्जांची उपस्थिती आहे. राजपथावरील यंदाच्या परेममध्ये वेगळेपण दिसून आलं. दरवर्षी सैन्याचा बँड वाजवून परेडला सुरुवात केली जाते. मात्र, यंदा नवी सुरुवात पाहायला मिळाली. देशभरातील १०० महिलांनी सांस्कृतिक पारंपरिक वाद्य वाजवून परेडला सुरुवात केली. तसेच, शंखनादही झाला. 

विकसित भारत आणि भारत-लोकतंत्र की मातृका या थीमवर आधारित यंदाचा परेडसोहळा होत आहे. राजपथावरील या परेडमध्ये १३,००० प्रमुख पाहुणे सहभागी होत आहेत. यंदा प्रथमच समाजातील सर्वच वर्गातील नागरिकांना प्रातिनिधीक स्वरुपात राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात भाग घेता आला आहे. यंदाचा हा कार्यक्रमत दीड तांसाचा आहे. राजपथावरील या सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून तब्बल १४,००० जवान प्रमुख पाहुणे व नागरिकांच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून उभे आहेत. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध राज्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक प्रदर्शन घडवणारे चित्ररथ राजपथावर दिसून आले. या चित्ररथांवरील कलाकृती आणि संस्कृतीने देशावासीयांचे लक्ष वेधले. यंदाच्या चित्ररथात अयोध्येतील रामललाचेही देशवासीयांना दर्शन घडले. झारखंड, गुजरात, लदाख, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणासह विविध राज्यातील संस्कृती दर्शवणारे चित्ररथही दिसून आले. त्यामध्ये, यंदाच्या अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याची झलकच दिसली. उत्तर प्रदेशच्या चित्ररथात रामललाचे दर्शन घडले. 

दरम्यान, भारतीय सैन्य दलाच्या हवाई आणि कर्तव्य पथावरील कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. भारतीय सैन्य दलाची ताकद यानिमित्ताने देशवासीयांना आणि जगालाही पाहायला मिळाली.   

टॅग्स :delhiदिल्लीRepublic Dayप्रजासत्ताक दिन २०२४IndiaभारतRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याIndian Armyभारतीय जवान