शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
3
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
4
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
5
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
6
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
7
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
8
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
9
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?
10
चौथीच्या वर्गात झालं होतं भांडण; ५० वर्षांनी मित्रांनी घेतला बदला, समोरच्याचे २ दात तोडले
11
RCB च्या चाहत्यांना 'धक्का'? विराट कोहलीच्या 'या' संघाची होणार विक्री? मालक का करतायेत विकण्याचा विचार?
12
आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर
13
२ वर्षात ११४१% ची तेजी, आज कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट; संरक्षण क्षेत्रात काम करते कंपनी
14
धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ
15
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
16
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
17
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
18
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
19
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
20
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

काँग्रेस धर्मविरोधी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप खोटा; प्रियांका गांधींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 10:34 IST

काँग्रेस महात्मा गांधींच्या तत्त्वांचे पालन करणारी 

रायबरेली : काँग्रेस महात्मा गांधींच्या तत्त्वांचे पालन करतो. महात्मा गांधी यांच्या मुखातून मृत्यूपूर्वी ‘हे राम’ असे उद्गार निघाले होते. ही सारी पार्श्वभूमी लक्षात घेता काँग्रेस हा धर्मविरोधी पक्ष आहे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप खोटा ठरतो, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गुरुवारी सांगितले.केरळमधील वायनाडसोबतच काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातूनही लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. 

रायबरेलीतील चौदाह मिल राऊंडअबाऊट या भागात झालेल्या प्रचारसभेत प्रियांका गांधी म्हणाल्या की, काँग्रेस हिंदूविरोधी असल्याचा आरोप पंतप्रधान करतात. आम्हीच हिंदू धर्माचे अभिमानी आहोत असा भाजप दावा करतो. मात्र उत्तर प्रदेशात सरकारकडून चालविल्या जाणाऱ्या गोशाळांची बिकट अवस्था आहे.

त्यांनी सांगितले की, अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरामध्ये झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काँग्रेस पक्षाचे लोक उपस्थित राहिले नाहीत म्हणून आम्हाला दोष दिला जातो. मात्र उत्तर प्रदेशमधील गोशाळेतील अत्यंत दयनीय अवस्थेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याकडे भाजपने लक्ष दिलेले नाही. 

छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारने गोशाळांच्या स्थितीत सुधारणा केली होती. तसेच तेथील गाईंचे शेण विकत घेतले जायचे. जेणेकरून गोशाळा चालविणाऱ्या गटांना आर्थिक मदत होईल.

 

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४rae-bareli-pcरायबरेलीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस