शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुराच्या पाण्यात शेकडो गाड्या बुडाल्या, नोएडामधील 'हे' दृश्य पाहून तुम्हाला बसेल धक्का; पाहा, व्हिडिओ... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 20:43 IST

हिंडन नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे गाझियाबाद आणि नोएडातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

देशाची राजधानी दिल्लीत पावसामुळे यमुनेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. तब्बल ४५ वर्षांनंतर येथील नदीच्या पाणी पातळीने २०८ मीटरचा टप्पा ओलांडला. या महिन्यात यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत ऐतिहासिक वाढ झाल्याने दिल्लीतपूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दिल्लीतील सखल भागात पाणी साचल्यामुळे परिणाम दिसून आला. तसेच, हजारो लोकांना पुराचा फटका बसला. 

आता देशाच्या राजधानीत परिस्थिती हळूहळू सुधारत आहे, परंतु धोका पूर्णपणे टळलेला नाही. दरम्यान, हिंडन नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे गाझियाबाद आणि नोएडातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, एक व्हिडिओ नोएडाच्या इकोटेक परिसरातून समोर आला आहे, ज्यामध्ये पूरपरिस्थिती बिकट असल्याचे दिसून येत आहे. 

इकोटेक ३ जवळील मोकळ्या जागेत शेकडो वाहने पाण्यात बुडाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. हा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे. ज्या ठिकाणी ही वाहने पुराच्या पाण्यात बुडाली आहेत, तो भाग नोएडा सेक्टर १४२ जवळ आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्रेटर नोएडातील हैबतपूर, छोटापूर, शाहबेरी भागात पुराचे पाणी आल्यामुळे लोकांचे नुकसान झाले आहे. तसेच गाझियाबाद बॅराजमधून हिंडन नदीत पाणी सोडल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

हिंडन नदीच्या पाण्याची पातळी वाढलीशनिवारपासूनच हिंडन नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली होती. सोमवारी झालेल्या पावसामुळे हिंडण नदीच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. पूरस्थिती पाहता प्रशासन सतर्क आहे. प्रशासन पाणी येणाऱ्या भागात लाऊडस्पीकरद्वारे लोकांना सतत घराबाहेर पडण्यास सांगत आहे. नोएडा व्यतिरिक्त गाझियाबादमध्येही हिंडन नदीला पूर आला आहे. फारुखनगर, मोहननगर, साहिबााबाद आदी भागात पुराचे पाणी शिरले आहे. दरम्यान, १९७८ पासून हिंडन नदीला कधीही पूर आला नव्हता. मात्र यावेळी परिस्थिती अत्यंत भयावह असून तब्बल ४५ वर्षांनंतर हिंडन नदीच्या पाणीपातळीत एवढी वाढ होताना दिसत आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdelhiदिल्लीfloodपूरRainपाऊस