उत्तर प्रदेशमधील मिल्किपूर विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षामध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मिल्किपूर पोटनिवडणिुकीच्या प्रचारादरम्यान दलित मुलीवर झालेल्या बलात्काराचा मुद्दा उपस्थित केला. तसेच विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला चौफेर घेरले. तसेच २०२४ च्या लोकसभा फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार हे दुर्दैवाने खासदार बनले, अशी टीका केली. त्यांनी सांगितले की,जेव्हा कुणी माफिया मरतो, तेव्हा सपा मर्सिया वाचालया जाते. एका दलित मुलीवर अत्याचार करणारा मोईद खान यांचा हीरो असतो.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, मुगली तर मुलगी असते. तिचा सन्मान ठेवला पाहिजे. तिचं रक्षण केलं पाहिजे. डीएनए चाचणी झाली पाहिजे, अशी मागणी हे लोक करत आहेत. खरंतर त्या मुलीचा जबाब पुरेसा आहे. तरीही या लोकांना त्या मुलीच्या अब्रूशी खेळ करायचा आहे. हेच समाजवादी पार्टीचं खरं रूप आहे. यांचे जेवढे म्हणून चेले होते, ते सर्व कुणाची बहीण-मुलगीची अब्रु, कुण्या शेतकऱ्याच्या सुरक्षेसाठी धोका होते. माफिया होते. जे जिथे जमीन पाहायचे तिथे कब्जा करायचे. सुरक्षेला सुरुंग लावण्याचं काम करायचे. आता त्यांनाही इशारा देण्यात आला आहे की, आता तुमचा प्रवास पूर्ण झाला आहे.
यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आवाहन केलं की, येथून मोईद खानच्या भक्तांना निवडणुकीत जिंकवून पाठवता कामा नये. या लोकांनी येथील विकास खंडित केलेला आहे. जे अशा घटना घडवून आणत आहेत. त्यांना कधीही पुढे येऊ देता कामा नये. हे मोईद खानला डोक्यावर घेणारे लोक मुलींच्या सुरक्षेसाठी धोका आहेत. त्यामुळेच मी म्हणतो की, ‘’देख सपाई, बिटीया घबराई’’, आता मिल्किपूरमधील विजयाचा संदेश हा दूरदूरपर्यंत जाईल, असेही योगी म्हणाले.