शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चोराचा अजब कारनामा; चोरी करायला घरात शिरला अन् AC च्या थंडाव्यात झोपी गेला, सकाळी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 19:39 IST

चोराचा अजब कारनामा; चोरी करायला घरात शिरला अन् AC च्या थंडाव्यात झोपी गेला, सकाळी...

एखाद्या घरात चोरी केल्यानंतर चोर कुठलाही पुरावा सोडत नाहीत. पण, कधी-कधी चोरी फसते अन् चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकतो. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये तर चोरीची विचित्र घटना घडली आहे. चोरी करण्यासाठी एका बंद घरात गेलेला चोर थकला अन् घरातील AC लावून चक्क झोपी गेल. सकाळी शेजाऱ्यांनी पोलिसांना चोरीची माहिती दिली. या विचित्र घटनेची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोराने रविवारी पहाटे कुलूप तोडून लखनऊच्या इंदिरानगर सेक्टर 20 येथील डॉ. सुनील पांडे यांच्या घरात प्रवेश केला. त्याने सर्व मौल्यवान वस्तू पोत्यात भरुन ठेवल्या. तेथून पळून जाण्याची त्याच्याकडे संधी होती, पण तो चक्क घरातील एसी लावून झोपी गेला. सकाळी शेजाऱ्यांना डॉक्टर पांडे यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यांनी आत डोकावून पाहिले असता, घर अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले. यानंतर शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. 

पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना चोर झोपलेला दिसला. चोरटा दारुच्या नशेत इतका गाढ झोपला होता की, त्याला पोलिस येईपर्यंत जाग आली नाही. कपिल त्या असे चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी कपिलला अटक केली असून त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 379अ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :RobberyचोरीUttar Pradeshउत्तर प्रदेशThiefचोर