शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 12:07 IST

lok sabha elections 2024 : चर्चेतील जागा म्हणजे उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभेची जागा आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान, विविध टप्प्यांत येणाऱ्या लोकसभेच्या जागांसाठी राजकीय पक्ष अजूनही आपल्या उमेदवारांच्या नावावर चर्चा करत आहेत. यातील एक चर्चेतील जागा म्हणजे उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभेची जागा आहे. भाजपाचे ब्रिजभूषण शरण सिंह सध्या याठिकाणी खासदार आहेत. 

कैसरगंजमधून कोणाला तिकीट द्यायचे याबाबत भाजपामध्ये अद्याप एकमत झालेले नाही. पण, आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, भाजपा कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट रद्द करू शकते. यासंदर्भात घोषणा पक्षाकडून लवकरच केली जाणार आहे. तसेच, भाजपा कैसरगंज मतदारसंघातून ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा करण भूषण सिंह यांना उमेदवारी देऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात 6 महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांसंबंधीच्या प्रकरणात 'आरोप निश्चित करण्या'वर आदेश देण्यासाठी राऊस एव्हेन्यू कोर्टाने 7 मे 2024 ही तारीख निश्चित केली आहे. दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांनीही आपल्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

20 मे रोजी होणार मतदान  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी कैसरगंज लोकसभा जागेवर मतदान होणार आहे. 2019 च्या निवडणुकीत ब्रिजभूषण शरण सिंह यांनी ही जागा जिंकली होती. त्यांना 5,81,358 मते मिळाली.  बसपाचे चंद्रदेव राम यादव यांना 3,19,757 तर काँग्रेसचे उमेदवार विनयकुमार पांडे यांना 3,7132 मते मिळाली. 2019 मध्ये सपा-बसपा एकत्र निवडणूक लढले होते. 

टॅग्स :kaiserganj-pcकैसरगंजlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४brij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंह